खासदार निधीत तिप्पट वाढ होण्याचे संकेत

    13-Mar-2020
Total Views |

parliament_1  H


नवी दिल्ली : खासदारांना त्यांच्या संसदीय कार्यक्षेत्राच्या विकासासाठी मिळणारा वार्षिक खासदार निधी तीन पटीने वाढण्याची शक्यता आहे.याकरिता संसदीय कार्यसमितीने सरकारकडे शिफारस केली आहे. हा खासदार निधी ५ कोटी रुपयांवरून १० किंवा १५ कोटी रुपये करण्याची शिफारस संसदीय समितीने सरकारला केली आहे.


संसदेच्या अर्थसंकल्पाचा अंदाज व खासदारांच्या निधीसाठी खर्च होणाऱ्या निधीचे मूल्यांकन करावे असे संसदीय कार्य समितीने केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयाला (एमओएसपीआय) सांगितले. समितीने एमओएसपीआय वरील आपल्या अहवालात असेही निदर्शनास आणून दिले आहे की बर्यातच काळापासून खासदार निधीमध्ये कोणताही वाढ झालीनाही. हा अहवाल गुरुवारी संसदेत सादर करण्यात आला.


दरवर्षी अर्थसंकल्पात लोकसभा व राज्यसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात व संबंधित क्षेत्रात विकासकामे करण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. समितीने अहवालात म्हटले आहे की, बहुतेक राज्यांमध्ये आमदारांना वर्षाकाठी चार कोटी रुपये आमदार निधी म्हणून खर्च करण्यास दिले जातात. एका लोकसभा मतदारसंघात ५ ते ७ आमदार असतात. या तुलनेत खासदार निधी अगदीच नगण्य आहे आणि यामुळे खासदारांना जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यातही हा अडसर ठरतो. यामुळे खासदार निधी दुप्पट किंवा तिप्पट करावा अशी मागणी करण्यात आली आहे.