कोरोनाच्या दहशतीमुळे धास्तावलेल्या मुंबईकरांना बनावट सॅनिटायझरची विक्री!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2020
Total Views |
sanitizer_1  H




ग्राहकांना बनावट सॅनिटायझर विकणार्‍या व्यक्तीला कांदिवलीमध्ये अटक

मुंबई : महाराष्ट्रासह जगभरात कोरोना व्हायरसची भीती पसरत आहे. दरम्यान आता या व्हायरसपासून बचावण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे याकडे नागरिकांचा कल आहे. पण या भीतीचा गैरफायदा घेत मुंबईमध्ये काही कंपनींकडून बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवण्यात आले आहेत. नुकतीच त्यावर एफडीएकडून धाड टाकून हा काळाबाजार बंद करण्यात आला आहे. यामधून ३ लाख रुपयांचे हॅन्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान या फसवणूकीच्या धंद्यामध्ये एका व्यक्तीला कांदिवली भागातून अटक करण्यात आली असून शुक्रवारी कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

‘Biotol’ असे या प्रोडक्टचे नाव असून सुमारे सव्वा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. कांदिवली पाठोपाठ अजून ठिकाणी एफडीए कडून धाड टाकण्यात आली असून त्यामध्ये बनावट हॅन्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये Biotol आणि WIZ यांचे १ लाख ७९ हजार रूपयांचे प्रोडक्ट्स आहेत. दरम्यान या बनावट हॅन्डसॅनिटायझर बनवणार्‍यांपैकी एकाही व्यक्तीकडे एफडीए अप्रुव्ह्ड लायसन्स नव्हते. मुंबई शहरामध्ये इतरही काही दुकानांमध्ये धाड टाकणार असून इथेनॉल अल्कोहोलचे सोर्स काय असतील याची पाहणी केली जाणार असल्याची माहिती एफडीएच्या अधिकार्‍यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. प्रत्येकाने हॅन्ड सॅनिटायझर घेण्यापूर्वी लायसंस नंबर आणि पॅकेजिंग डेट पाहून घ्यावी, असे आवाहन एफडीएने ग्राहकांना केले आहे.


मुंबईच्या कस्तुरबा रूग्णलयामध्ये सध्या कोरोना व्हायरसचे निदान करण्यासाठी लॅब असून तेथेच २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल रात्री ठाण्यामध्ये एका रूग्णाला कोरोनाचे निदान झाले असून, सध्या महाराष्ट्रात १४ कोरोनाग्रस्त असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@