कोरोनामुळे प्रसिद्ध आंजर्ले कासव महोत्सवाला स्थगिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2020
Total Views |
turtle_1  H x W
 
 
 

  गर्दी टाळण्यासाठी वन विभाग आणि स्थानिकांचा निर्णय

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर दरवर्षी आयोजित होणाऱ्या कासव महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे. महोत्सवाला होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वन विभाग महाराष्ट्र शासन, मॅंग्रोव्ह सेल, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण आणि कासव मित्र आंजर्ले या संस्थांनी हा निर्णय घेतला आहे. यंदा महोत्सव १४ ते ३१ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
 
 
 
कोकणात कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत आंजर्ले किनाऱ्यावर आयोजित केल्या जाणाऱ्या कासव महोत्सवाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१४ पासून हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यावेळी अंड्यातून बाहेर पडणाऱ्या नवजात कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात येते. या पिल्लांना पाहण्यासाठी राज्याच्या विविध शहरांमधून दरवर्षी सात ते आठ हजार पर्यटक आंजर्लेला भेट देतात. त्यामुळे महोत्सवात गर्दी होते. मात्र, कोरोनो व्हायरसच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता ही गर्दी टाळण्यासाठी यंदाचा कासव महोत्सव स्थगित करण्यात आला आहे.
 
 
 
 
यंदा कासव महोत्सवाचे पहिले सत्र १४ ते ३१ मार्च दरम्यान पार पाडणार होते. मात्र, महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीचा ओघ लक्षात घेता कोरोना व्हायरच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महोत्सव तूर्तास स्थगित केल्याची माहिती कासव मित्र आंजर्लेचे व्यवस्थापक तृशांत भाटकर यांनी दिली. तसेच महोत्सवाला मुंबई-पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ लक्षात घेता कोरोनाच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे दापोलीचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@