'पक्षाला बळकटी देण्यासाठी ज्योतिरादित्यांची मदत होईल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2020
Total Views |

rajnath singh_1 &nbs



नवी दिल्ली :
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत काल(बुधवार) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज (गुरुवार) त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ज्योतिरादित्य शिंदे भाजपला आणखी बळकटी आणतील, असे म्हणत सिंह यांनी शिंदे यांचे भाजपात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले.





'ज्योतिरादित्य शिंदे यांची आज भेट घेतली. भाजपमध्ये त्यांचे स्वागत आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला आणखी बळकटी मिळेल. पक्षप्रवेश केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा', असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे. शिंदे यांनी अमित शाह यांचीही भेट घेतली. मध्यप्रदेशातील नागरिकांच्या कल्याणासाठी शिंदेंचा पक्षप्रवेश भाजपला बळकटी देईल, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.आज शिंदे भोपाळमध्ये दाखल होणार आहे. भाजपतर्फे त्यांचे मध्यप्रदेशात जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. काल भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी भाजप प्रवेश केला. काँग्रेसमध्ये राहुन लोकांचे स्वप्न पूर्ण करता येत नसल्याचे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यामुळे मध्यप्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
@@AUTHORINFO_V1@@