आता बहुचर्चित 'डिस्नी प्लस' भारतातही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |

hotstar disney plus_1&nbs
 
 
 
मुंबई : जागतिक मनोरंजन क्षेत्रामध्ये 'डिस्नी' कंपनी सर्वात बलाढ्य मानली जाते. भारतामध्येही या ब्रँडचे करोडो चाहते आहेत. तसेच, जगभर ज्या लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपची चर्चा आहे तो डिस्नी प्लस अँप भारतातही लवकरच येणार आहे. हॉटस्टार या प्रसिद्ध लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपसोबत डिस्नी प्लसचे सर्व कार्यक्रम २९ मार्च पासून भारतीयांनाही पाहता येणार आहे. त्यामुळे भारतीय मनोरंजन विश्वातील ही सर्वात मोठी घडामोड असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
 
 
 
अॅमेझॉन, नेटाफिक्स सारख्या ऑनलाईन पोर्टलला तगडी टक्कर द्यायला आता प्रसिद्ध 'डिस्नी कंपनी' स्वतः 'डिस्नी प्लस' घेऊन ऑनलाईन बाजारात उतरत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक आर्थिक गणिते बदलणार असल्याची चर्चा आता मनोरंजन वर्तुळात रंगली आहे. आयपीएल २०२० सुरु होताच २९ मार्च पासून 'डिस्नी प्लस'ची सर्व्हिसदेखील 'हॉटस्टार'वर सुरु होणार आहे. डिस्ने प्लसमुळे हॉटस्टारचा चेहरा मोहरा बदलला आहे. हॉटस्टार वापरकर्त्यांच्या आता फोनमध्ये नवीन डिझाईन्स, लोगो आणि रंगांसह उपस्थित आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@