"राहुलजी, तुमची सुट्टी मजेत गेली असेलच"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |

rahul gandhi_1  
 
 
मुंबई : सध्या जगभरामध्ये कोरोनामुळे अनेक गरजेच्या वस्तूंमध्ये उलथापालथ होत आहे. आयात-निर्यात, विविध देशांमधील आपसातील देवाण घेवाण यामुळे अनेक गोष्टीवर परिणाम झाला आहे. तसेच, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या भावामध्येदेखील चढउतार चालू आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि भाजपबद्दल ट्विट केले. यावर भाजप महाराष्ट्राने टोला लगावत, 'वेलकम राहुलजी, तुमची सुट्टी मजेत गेली असेलच.' असे खोचक ट्विट केले आहे.
 
 
 
मध्यप्रदेशमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींनी पेट्रोल डिझेलच्या उतरत्या भावाची आठवण करून एक ट्विट राहुल गांधींनी केले होते. यावर भाजपच्या महाराष्ट्र ट्विटरने ट्विट करत, 'राहुल गांधीजी तुमचे स्वागत आहे. तुमची सुट्टी मजेत गेली असेल अशी आशा आहे. तुम्ही देशाबाहेर असताना महाराष्ट्रामध्ये तुमच्या आघाडी सरकारने पेट्रोल व डिझेलवर १ रुपया अधिभार लावण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाबाबत काँग्रेसला विचारले नसावे,' असा टोला लगावला आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@