लेफ्ट. जनरल धिल्लाँ ‘डीआयए’च्या महासंचालकपदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2020
Total Views |
Lt Gen KJS Dhillon_1 
 
 

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लाँ यांनी मंगळवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टॉफमधील संरक्षण गुप्तचर संस्थेच्या (डीआयए) महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला. भारतीय लष्करी अकादमीच्या १९८३च्या तुकडीचे अधिकारी असलेले धिल्लाँ यांनी गेल्या वर्षी लष्कराच्या रणनीतिक पंधराव्या कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे यशस्वीपणे सांभाळली होती.



जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लोकाभिमुख मोहिमा राबवून, नागरिकांना दहशतवादापासून दूर करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या नव्या नियुक्तीला आदेश नुकताच जारी करण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@