मुस्लीमांना आरक्षण देणाऱ्यांना अयोद्धेत पाय ठेवू देणार नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2020
Total Views |
Uddhav Thackeray_1 &
 
 
 
 

मुख्यमंत्र्यांना महंत राजू दास यांची धमकी

 
 
लखनऊ : राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे यांना महंत राजू दास यांनी उघड धमकी दिली आहे. मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण देणाऱ्या आणि हिंदुत्वच्या मार्गातून बाजूला होणाऱ्या उद्धव ठाकरेंना अयोद्धेत येऊ देणार नाही, अशी भूमीका त्यांनी घेतली आहे. तसेच हिंदुत्वविरोधी भूमीका घेणाऱ्यांना माफी नाही, असा घणाघातही त्यांनी केला आहे.
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोद्ध्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाविकास आघाडीला शंभर दिवस पूर्ण होत असून यानिमित्त शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. शिवसेनेची हिंदूत्ववादी भूमीका ही मवाळ होत असल्याचा आरोप झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही या दौऱ्यावर यावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

 
 
त्यानंतरही तिन्ही पक्षांमध्ये वाद झाला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला मंदिर बांधण्यासाठी जाणार असतील, तर मी बाबरी बांधण्यासाठी जाईन, असा इशारा फरहान आझमी यांनी दिला होता. यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आले.
 
 
 
 
कसा असेल उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा ?
 
 
 
उद्धव ठाकरे सात मार्च रोजी दुपारी अयोद्धेत प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतील. सायंकाळी शरयू नदीवर आरती केली जाईल. या दरम्यान, शिवसेनेचे मंत्री, आमदार खासदार आणि शिवसैनिकही सहभागी होणार आहेत. अयोद्धेपासून राजकारण दूर ठेवा, असा सल्ला यापूर्वीही संत महंतांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता.


@@AUTHORINFO_V1@@