एकासोबत निवडणुका आणि दुसर्‍यासोबत सत्ता : राज ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2020
Total Views |
Raj_1  H x W: 0



राज ठाकरे यांचा शिवसेनेवर घणाघात

ठाणे : "सध्याचे राजकारण हे बटबटीत आहे म्हणण्यापेक्षा ते विचित्र आहे, असे म्हणावे लागेल. कारण सध्या एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसर्‍यासोबत सत्ता स्थापन करायची. तर सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचे, हे दुर्देवी आहे," असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर रविवारी नाव न घेता घणाघाती हल्ला चढविला.
 
 
 
ठाण्यात एका वृत्तसमूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, "नागरिकांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन कलात्मक आहे. विधानसभा निवडणुकीत निकाल लागेपर्यंत आनंद झाला होता. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतरचे चित्र काहीसे वेगळेच असल्याचे पहायला मिळाले. राज्यात कोणीही कोणाच्या मदतीने सरकार स्थापन करत आहे हेच यावेळी दिसून आले. एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसर्‍यासोबत सत्ता स्थापन करायची, सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचे हे दुर्देवी वाटते, " असे ते म्हणाले.
 
 
"माझ्यासाठी राजकारणाचा अर्थ निवडणुकांच्या पलीकडे आहे. सध्याचे राजकारण हे बटबटीत वाटते. राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हेच पहायला मिळाले की पक्षांतर करणार्‍यांना जनतेने चांगलाच धडा शिकवला, " असे ते यावेळी सांगायला विसरले नाहीत.


@@AUTHORINFO_V1@@