देशाचे आणि हिंदुंचे भाग्य एकच : भैयाजी जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2020
Total Views |
मुंबई : देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार हिंदू समाज आहे. केवळ साक्षी नाही तर त्याच कारण पण हिंदू समाज आहे. देशाच्या वैभवकाळाला आणि पतनाला हिंदूच जबाबदार आहे. देशाचं आणि हिंदुंचं भाग्य एकच असून, नाकारात्मकतेला हिंदू समाजामध्ये स्थान नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केले. ते गोव्यात आयोजित 'विश्वगुरु भारत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून' या कार्यक्रमात बोलत होते.
'विश्वगुरु भारत’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमात संबोधित करताना ते म्हणाले की,‘चालू शताब्दी ही हिंदुत्वाची शताब्दी आहे असे म्हंटले गेले आहे. तर २०२० मध्ये भारताकडे सुपर पॉवर असतील, भारत विश्वगुरु असेल अशा चर्चाही झाल्या होत्या. मात्र, भारताला सुपर पॉवरपेक्षा, सुपर राष्ट्र होणे आवश्यक आहे असे मला एका विद्वानाने सांगितले.’ हे राष्ट्र शक्तिमान झाले पाहिजे आणि जगासमोर आदर्श म्हणून उभे राहिले पाहिजे, हे संघाचे उद्दिष्ट आहे. आणि श्रेष्ठ विचार करून चाललेला हा देश आणि हा समाज आहे तो दुर्बल असता कामा नये. तो सामर्थ्य संपन्न असला पाहिजे हेच संघाने म्हंटले आहे. भारताचे चिंतन हे सर्वकालिक आहे. ते वैश्विक आहे आणि सर्वांसाठी आहे. त्यामुळे आपल्याला ‘विश्वगुरु’ ही कल्पना करायची असेल तर ती एवढीच आहे, की जगासमोर वेगळा आदर्श प्रस्थापित करण्याची भूमिका ही भारताची आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय नाही तर, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय हा विचार भारतीयांनी स्वीकारलेला आहे. 
भारतासारखा अत्याचार कोणत्याही देशावर झालेला नाही. परकीय आक्रमणाच्या प्रतिकूल परिस्थितीतही भारताने आपले अस्तित्व टिकवून ठेवले. भारत अनंत काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे, हे भारताचे भाग्य आहे. हा मृत्युंजय भारत आहे, त्यामुळे इथे राहणारे हे अमृतपुत्र आहेत. भारत कधी संपणार नाही, हिंदू समाज नष्ट होणार नाही. जगाला समन्वयाच्या मार्गावर चालायला शिकवण्याचे दायित्व भारत आणि हिंदू समाजावर आहे. समाजातील प्रश्न समजणारे आणि प्रश्नावर उत्तर शोधणारे स्वयंसेवक संघाने निर्माण केले. अन्नधान्याच्या क्षेत्रात आपण स्वावलंबी झालो तरी आज कुपोषणाने मारणाऱ्या माणसांची संख्या जास्त आहे. शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा असताना लोक निरक्षर आहेत आणि खेड्यापाड्यातील लोक औषधाअभावी मरत आहेत. त्यामुळे दोन प्रकारची चित्र आपल्यासमोर आहे. समाजाचे प्रश्न हे समूहाचे असतात आणि त्यामुळे गोष्टींचे नियोजन करता आले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. 
@@AUTHORINFO_V1@@