पंतप्रधान मोदी - राजपक्षे यांच्या द्वीपक्षीय चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2020
Total Views |

Pm Modi sri lanka Pm_1&nb
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी द्वीपक्षीय चर्चा झाली. यावेळी दहशतवादाचा दोन्ही देशांनी कठोरपणे सामना केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आगामी काळात भारत - श्रीलंकेदरम्यान संबंध अधिक मजबूत करण्यास भर देण्यात येईल, असे द्वीपक्षीय चर्चेत ठरविण्यात आले आहे.
 
श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंद्रा राजपक्षे पुन्हा एकदा नुकतेच विराजमान झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजपक्षे यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेस संबोधित केले. दहशतवाद ही दोन्ही देशांसमोरील समस्या असून दोन्ही देशांनी त्याचा कठोरपणे सामना केला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात श्रीलंकेत ईस्टर डे दहशतवादी हल्ला हा केवळ श्रीलंकाच नव्हे तर मानवतेवरील हल्ला होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
दोन्ही देशांमधील संबंधांना अधिक बळकटी दिली जाणार असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, श्रीलंकेत राबवावयाच्या संयुक्त आर्थिक परियोजना, परस्पर व्यापार, गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात आज चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील नागरिकांचा परस्परसंपर्क वाढविणे, पर्यटनास प्रोत्साहन देणे आणि दळणवळण अधिक सुलभ करण्याविषयीदेखील चर्चा करण्यात आली. सुरक्षा, अर्थव्यवस्था, सामाजिक प्रगती आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे परस्परसंबंध आहेत. श्रीलंकेत स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी ही भारतासह संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्राच्या हिताची आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेच्या प्रगतीतील महत्वाचे योगदान असणाऱ्या तामिळ बांधवांच्या समानता, न्याय, शांतता आणि सन्मानाच्या अपेक्षाही श्रीलंका सरकार पूर्ण करेन, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@