दिल्लीकरांनो मतदानाला बाहेर पडा, विक्रमी मतदान करा : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2020
Total Views |

Delhi voting day_1 &
 

सकाळी १० वाजेपर्यंत दिल्लीमध्ये ४.३३ टक्के मतदान

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रिंगणात उतरलेल्या ६७२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. "दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला बाहेर पडा आणि विक्रमी मतदान होऊद्या." असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना केले आहे.
 
सकाळी १० वाजेपर्यंत दिल्लीमध्ये ४.३३ टक्के मतदान झाले. सकाळी ८ वाजेपासून दिल्लीमध्ये मतदानाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिक हळूहळू मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहकुटुंब सिव्हिल लाईन येथील बूथवर मतदान केले. केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे सुनिल यादव आणि काँग्रेसचे रोमेश सभरवाल या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. भानुमती तुघलक क्रेसेन्ट येथील केंद्रावर मतदान केले.
 
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन कुटुंबीयांसह कृष्णा नगरमधील रतन पब्लिक स्कूल येथे मतदान केले. तर, दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल सहपत्नीक ग्रेटर कैलाश येथील मतदान केंद्रात मतदान केले. दिल्लीतील १.४६ कोटी मतदार आपला मताधिकार बजाविणार आहेत. मतदानासाठी दिल्लीमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@