कोरोनाचा फटका ; ह्युंदाईचे उत्पादन बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2020
Total Views |


hyundai_1  H x


सोल : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात सर्वाधिक कारचे उत्पादन करणारा दक्षिण कोरियातील प्रकल्प शुक्रवारी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाची प्रमुख वाहन निर्माती कंपनी असणाऱ्या ह्युंदाईने आपले उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला. चीनमध्ये कोरोना  विषाणूचा धुडगूस वाढल्याने वाहनांच्या आयात होणाऱ्या सुट्या भागांची कमतरता भासत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ह्युंदाईच्या या प्रकल्पात वार्षिक १४ लाख कारचे उत्पादन घेण्यात येते.

करोना विषाणूमुळे चीनच्या बाहेर बंद पडलेला हा पहिलाच कारखाना ठरला आहे. बंद पडलेल्या कारखान्यामुळे ह्युंदाईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी पाच दिवस बंद राहिल्यास किमान ५० कोटी डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

ह्युंदाईचा हा प्रकल्प सोलच्या किनारी भागातील उलसान येथे आहे. त्यामुळे वाहनांच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणावर आयात आणि निर्यात करणे सोपे जाते. मात्र, चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने तेथील कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे चीनमधून आयात होणारे वाहनांचे सुटे भाग मिळणे दुर्लभ झाले आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील ह्युंदाईसह अन्य कंपन्यांनी वाहनांची निर्मिती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकट्या दक्षिण कोरियातच जवळपास २५ हजार कामगारांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. कामगारांना सुट्टीवर पाठवण्यात आल्याने काम बंद राहणार असून, कामगारांच्या वेतनात कपातही करण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@