देशाची राजधानी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020
Total Views |


delhi election _1 &n


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. दिल्लीतील १.४६ कोटी मतदार आपला मताधिकार बजाविणार आहेत. मतदानासाठी दिल्लीमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.


दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी उद्या मतदान होणार असून ७० जागांसाठी एकुण ६६८ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीमध्ये एकुण १ कोटी ४६ लाख ९२ हजार १३६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. अंतिम मतदार यादीनुसार दिल्लीत ८०.५५ पुरुष तर ६६.३५ महिला मतदार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी एकुण ९० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मतदानासाठी एकुण १३ हजार ७५० बुथ असणार आहेत.


चोख सुरक्षाव्यवस्था


मतदान सुरळीत आणि शांततेच्या वातावरणात पार पडावे यासाठी दिल्लीमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्यासाठी सुरु असलेल्या शाहीन बाग येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. दिल्लीमध्ये एकुण ४० हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून २ हजार ६८९ मतदान केंद्रांवर बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राचा परिसर आणि ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी सीएपीएफच्या १९० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्डचे १९ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.



दिल्लीतील एकुण मतदान केंद्रांपैकी संवेदनशील अशा ५४५ केंद्रांसाठी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सीएएविरोधात आंदोलन सुरु असलेल्या शाहीन बाग परिसरातील ५ मतदान केंद्रांचा समावेश आहे. तसेच २१ मतमोजणी केंद्रांसाठी बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था आहे. मतदानापूर्वी आणि मतदानाच्या दिवशी गैरप्रकार, मद्यवाटप आणि आर्थिक प्रलोभनांच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठीही पोलिस यंत्रणा सतर्क आहे.

@@AUTHORINFO_V1@@