सांगलीत फुलले कमळ : महापौरपद भाजपकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020
Total Views |

Sabgli BJP Geeta Sutar_1&
सांगली : सांगलीचे महापौरपद भाजपकडे आले आहे. सागंली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार यांची निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांचा ४३ विरुद्ध ३५ अशा मतांनी पराभव केला आहे. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष निवड सभा घेण्यात आली. त्याचप्रमाणे, उपमहापौरपदी भाजपचेच आनंदा देवमाने यांची निवड झाली आहे.
 
 
काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे मतदान घेण्यात आले होते. काँग्रेस आघाडीकडून नगरसेविका वर्षा निंबाळकर यांची उमेदवारी दाखल केली होती. भाजपच्या ४१ सदस्यांसह दोन सहयोगी सदस्यांनीही गीता सुतार यांना मतदान केले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण ३५ सदस्यांनी वर्षां निंबाळकर यांना मतदान केले. मतदान झाल्यानंतर ज्या मतदारांनी मतदान केले त्यांच्या नावाखाली सदस्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा आणखी एक महापौरपद भाजपकडे आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@