भरसभेत काँग्रेस खासदारांची गुंडगिरी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020
Total Views |

mp loksabha_1  
 
 

सभागृहात काँग्रेसच्या खासदारांची वर्तवणूक गुंडगिरीची होती, भाजपाचा आरोप

 
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत दिल्लीच्या हौझ काझी येथे झालेल्या निवडणूक सभेमध्ये वादग्रस्त विधान केले होते. यावर शुक्रवारी लोकसभेमध्ये मोठा गदारोळ झाला. एवढेच नव्हे तर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संपूर्ण सभागृहाने याचा तीव्र निषेध करावा अशी मागणी केली. त्यानंतर राहुल यांच्या विधानाचा सभागृहात उल्लेख होताच काँग्रेसी खासदार त्यांच्यावर धावून जाऊन त्यांना घेराव घातला. यानंतर गोंधळ वाढत असल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभा दुपारपर्यंत स्थगित केले. मात्र, यासर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा काँग्रेसी खासदारांचे खरे रूप समोर आले.
 
 
 
या सर्व प्रकारावर कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी टीका करताना सांगितले की, "सभागृहात काँग्रेसच्या खासदारांची वर्तवणूक गुंडगिरीची होती. 'राहुल गांधींच्या भडकाऊ भाषणानंतर ते हिंसेच्या मार्गावर चालले आहेत.' डॉक्टर हर्षवर्धन यांच्याशी गैरवर्तन करण्याचा हा प्रयत्न होता. यातून काँग्रेसची निराशा आणि गुंडगिरी दिसून येते." तर "काँग्रेसच्या खासदारांची वृत्ती लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन राहुल गांधींचे विधान वाचत होते, त्यावेळी काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर त्यांच्या दिशेने आले. देशाच्या लोकशाहीसाठी हे दुर्दैवी आहे." अशी टीका भाजपा खासदार जगदंबिका पाल यांनी केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@