आगामी काळात बायोइंधनाचा वापर वाढणार : नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020
Total Views |


nitin Gadkari _1 &nb



नवी दिल्ली : “आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलसोबतच इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीनएजी, एलएनजी आणि हायड्रोजन या पर्यायी इंधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून वाहननिर्मिती क्षेत्रास याचा मोठा फायदा होईल,” असे मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘ऑटोएक्स्पो-२०२०’च्या उद्घाटनवेळी ते बोलत होते.



केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की
, “देशाचा विकास आणि महसुलामध्ये वाहननिर्मिती क्षेत्राची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. या क्षेत्रास मदत करण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर आहे. काही दिवसांपूर्वीच मी दोन इलेक्ट्रिकवर चालणार्‍या मोटारसायकलचे लोकार्पण केले होते. त्यामुळे आता आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलसोबतच इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी, एलएनजी आणि हायड्रोजन या पर्यायी इंधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे.” लवकरच पेट्रोल आणि डिझेलमध्ये १५ टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते कटरा, अमृतसर ते जामनगर आदी महामार्गांविषयीही काम सुरू असल्याचे गडकरी म्हणाले.



देशात महामार्गाचे जाळे

देशभरात १.४० लाख किलोमीटरचे महामार्ग बांधण्यात आले आहेत, त्यात आणखी ४० हजार किमीची भर घालण्यात येणार आहे. यापूर्वी देशात केवळ ९६ हजार किलोमीटरचे महामार्ग होते. दिल्ली -मुंबई एक्स्प्रेस हायवेसाठी १०० टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे. येत्या तीन वर्षांत हा महामार्ग बांधून पूर्ण होणार असून त्यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे अंतर रस्तेमार्गाने अवघ्या १२ तासांत कापणे शक्य होणार आहे,‘’ असे त्यांनी यावेळी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@