युवा पिढीचे प्रेरणास्थान ‘सिद्धीविनायक युवा संस्था’

    07-Feb-2020
Total Views | 42


siddhivinayak youth organ



टिटवाळा : दि. १२ जानेवारी, २००९ रोजी स्वामी विवेकानंद जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणूनदेखील साजरी केली जाते. त्याच दिवसाचे औचित्य साधून सिद्धीविनायक युवा संस्थेची स्थापना करण्यात आली. या वर्षी संस्थेच्या कारकिर्दीला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत सिद्धीविनायक युवा संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, क्रीडा या क्षेत्रात टिटवाळा तसेच मुरबाड, शहापूर, वासिंद, आंबिवली, कल्याण या भागात उल्लेखनीय कार्य केले आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांना स्वतःची नोकरी, शिक्षण, घर आणि संस्थेची कामे ही सगळी तारेवरची कसरत करत असतानाच कामाचे व वेळेचे योग्य नियोजन व व्यवस्थापन कशाप्रकारे करावे याचे पूर्णपणे आकलन झाले.



ग्रामीण भागातील समाजातील दुर्गम आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील मुलांना व आदिवासी व्यक्तींना कपडे
, शैक्षणिक साहित्य, दिवाळीचा फराळ पुरवणे, त्यांना खेळांचे प्रशिक्षण मोफत देणे, वृक्षारोपण अभियान राबवणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड व किल्ल्यांवर जाऊन किल्ले स्वच्छता अभियान राबवणे, गड व किल्ले संवर्धन करणे व युवकांना किल्ल्यांची व मराठ्यांच्या इतिहासाची माहिती करून देणे, रस्ते सुरक्षा अभियान राबवणे, साहसी खेळ व ट्रेकिंग आयोजित करणे, विविध विषयांवर व्याख्यान आयोजित करणे अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातात.



संस्था हे सर्व उपक्रम विनामूल्य राबवित असल्यामुळे सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ घेता येतो
. त्याचप्रमाणे संस्थेच्या अंतर्गत विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन हे क्रीडा मार्गदर्शन उपक्रम सुरू करून याच्या माध्यमातून विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. टिटवाळा येथे दरवर्षी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेत सहभाग घेणार्या युवकांची संख्यादेखील वाढू लागली. या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यासोबतच यातून विविध सामाजिक संदेश जसे एड्स जनजागृती, बेटी बचाओ, स्वच्छ भारत अभियान, आरोग्यासाठी धावा, स्वच्छ टिटवाळा, सुंदर टिटवाळा व अवयवदान अशा विविध विषयांवर सामाजिक जनजागृती करण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळून पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि उत्तम आरोग्यासाठी धावा हा होता.


तशा प्रकारची जनजागृती या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली
. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीने सन २०१८-२०१९ साठी ठाणे जिल्हा युवा संस्था पुरस्कारासाठी टिटवाळा येथील सिद्धीविनायक युवा संस्थेची निवड झाली. या पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी, २०२० रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (मंत्री - नगर विकास व सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र शासन) व राजेश नार्वेकर (ठामपा, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, ठाणे) यांच्या हस्ते साकेत पोलीस मैदान ठाणे येथे करण्यात आले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने दोन वेळा जिल्हा युवा संस्था पुरस्कार जाहीर झालेली सिद्धीविनायक युवा संस्था ही ठाणे जिल्ह्यातील एकमेव युवा संस्था ठरली आहे. दै. मुंबई तरूण भारतकडून संस्थेला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!


अजय शेलार

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121