श्वासागणिक आनंद देणारे श्वास फाऊंडेशन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020   
Total Views |


shwass foundation_1 



आजपर्यंत ‘श्वास फाऊंडेशन’ सुमारे ६० हजार लाभार्थी म्हणजेच १५ ते १६ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात वैयक्तिक लाभाच्या अशा २० ते २२ योजना घेऊन ‘श्वास फाऊंडेशन’चे कार्यकर्ते या कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहेत.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर, २०१८ रोजी ‘आयुष्मान भारत’ जन आरोग्य योजने’ची घोषणा केली. खर्‍या अर्थाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सरकारने हे पाऊल उचलले आहे. नागरिकांना जात-पंथ-धर्म किंवा त्यांची सामाजिक परिस्थिती कोणतीही असली तरी आरोग्याची सुविधा सारखीच प्राप्त व्हावी, या एकाच प्रेरणेने ही योजना सुरू करण्यात आली. कुटुंबामध्ये जर कोणते आरोग्याचे संकट उद्भवले तर संपूर्ण आर्थिक घडी विस्कटते. कधीकधी तर ते कुटुंब आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहते. काही प्रसंगी रुग्णास आपला जीवही गमवावा लागण्याची उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे आयुष्मान भारत योजना खरोखरच अशा कुटुंबांसाठी संजीवनी ठरत आहे.


या योजनेचा लाभ नाशिककर नागरिकांना विशेषत
: नाशिक पश्चिममधील नागरिकांना व्हावा, यासाठी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या संकल्पनेतून ‘श्वास फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली. आज या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन आहे. याबबत माहिती देताना पेशकार यांनी सांगितले की, “आजवरच्या राजकीय प्रवासामध्ये विविध शासकीय योजना राबवणे, त्याचा अभ्यास करणे, काही त्रुटी असल्यास सरकारकडे पाठपुरावा करणे याला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘आयुष्मान भारत’ची नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना गरज असून त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचविणे आवश्यक असल्याने नाशिकला योग्य दरात सर्वोत्तम सेवा देणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या श्रीगुरुजी रुग्णालयाचा आदर्श समोर होता. इतर व्यावसायिक रुग्णालयांपेक्षा ३० ते ४० टक्के स्वस्त दरात या ठिकाणी उपचार मिळतात. परंतु, हे उपचार करण्यासाठी ७० टक्केदेखील पैसे काही गरीब रुग्णांकडे नसल्याचे जाणवत होते.


त्यांच्यासाठी ही योजना अत्यावश्यक ठरते. रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर यांच्या सूचनेनुसार या योजनेबाबत अभ्यास करून काम करण्याचे ठरविले. कोणत्याही चांगल्या कामासाठी योजना राबविण्यासाठी आर्थिक नियोजन असणे आवश्यक आहे व वेळेचेही योगदान आवश्यक आहे. हे काम आपल्याला करायचे आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये केली व ‘श्वास फाऊंडेशन’चे प्रकल्प प्रमुख मकरंद वाघ, विजय पाळेकर, संजय दंडगव्हाळ आदींच्या साहाय्याने हे काम करण्याचा निश्चय केला. एक महिना नक्की कोणत्या कार्यालयातून काय मिळेल, हे समजण्यात गेला. त्यानंतर डिसेंबर २०१८ ला तयारी सुरू केली असता जाणवले की, एक कार्ड एक लाभार्थीचा खर्च हा शंभर रुपये येऊ शकतो. सरकारी यंत्रणेची अनास्था, सर्व स्तरावरील व्यावसायिक स्वरूप बघता हे खूप मोठे काम आहे, हे जाणवले. नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख लाभार्थी असून नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्रात १ लाख २५ हजार लाभार्थी आहेत. या सर्वांपर्यंत पोहोचणे हे दिव्यच होते.हा सर्व विषय डॉ. गोविलकर यांच्या कानावर घातला असता त्यांच्या प्रेरणादायी सल्ल्याने कामास सुरुवात करण्यात आली.



सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १ हजार कुटुंबांनी आपले नाव नोंदवले
. तेव्हाच लक्षात आले की, हे काम खूप मोठे आहे. त्यामुळे उत्साह वाढत होता. प्रतिसादही तेवढाच मिळत होता. पहिल्या पंधरा दिवसांतच गोल्डन कार्ड मिळण्यास सुरुवात झाली आणि मग सुरू झाले कार्डवाटप. नाशिक पश्चिम हे औद्योगिक क्षेत्र असून अनेक कंपन्यांच्या मालकांनी आपल्या कामगारांच्या कुटुंबीयांसाठी हे कार्ड काढण्यासाठी मदत केली. त्यावेळी चांगल्या कामासाठी चांगले लोक पैसे कमी पडू देत नाहीत, याची प्रचिती आल्याचे प्रदीप पेशकार आणि मकरंद वाघ आवर्जून नमूद करतात.



आज या सर्व नियोजनाची जबाबदारी कर्मचारी आणि कार्यकर्तावर्ग तसेच आपली नोकरी सांभाळून प्रकल्पप्रमुख मकरंद वाघ व अध्यक्ष विजय पाळेकर पार पाडत आहेत
. त्यांच्या जोडीला ‘श्वास फाऊंडेशनचे चार कर्मचारी व सुमारे ६० कार्यकर्ते अविरत मेहनत घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ व ’आयुष्मान भारत’ या योजना एकत्रितपणे राबविल्या जात आहेत. म्हणजे एका कुटुंबाचा पाच लाख रुपयांपर्यंत उपचारांचा खर्च सरकारतर्फे उचलला जात आहे. त्यापैकी दीड लाख रुपये ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ राज्य शासनाची आहे, त्याद्वारे प्रथम दिले जातील व ते संपल्यानंतर पुढील उपचाराचा खर्च हा केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ या योजनेमार्फत केला जाणार आहे. याची माहितीदेखील ‘श्वास फाऊंडेशन’च्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच जर रुग्ण महाराष्ट्राबाहेरील रहिवासी असेल तर त्याला मात्र सुरुवातीपासूनच आयुष्मान भारत योजनेतून पैसे मिळणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशी रुग्णांनी प्रथम रेशनकार्ड, आधारकार्ड याद्वारे महात्मा फुले योजनेचा लाभ घ्यावा व पैसे कमी पडल्यास आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वापरावे. अशी ही योजना असल्याचे प्रदीप पेशकार आणि मकरंद वाघ सांगतात.



काम करत असताना
आयुष्मान भारत’ कार्ड मिळाल्यानंतरचा आनंद हा अवर्णनीय असतो, हे पाहायला मिळाले. बालके आणि वृद्ध यांच्या चेहर्‍यावर कार्ड मिळल्यावर उमटणारे समाधानाचे भाव, कुटुंबातील माऊलीच्या चेहर्‍यावर वाढलेला आत्मविश्वास हाच खर्‍या अर्थाने समाजाचा केंद्र सरकारप्रती विश्वास आणि आमच्या कामाची पावती असल्याचे पेशकार सांगतात. कार्य करताना अनेक हृदयद्रावक अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केले. एक दिवस कार्यालयात तिशीतल्या एका जोडप्याने आपल्या दीड वर्षाच्या बाळासह प्रवेश केला. लाभार्थी यादीत त्यांचे नाव व त्या अनुषंगाने इतर सर्व बाबींची पूर्तता आहे. हे लक्षात आल्यावर त्यांना कार्ड मिळेल व आयुष्मान भारतअंतर्गत या तरुणाचे उपचार नक्की होतील, हे कळल्यानंतर त्याच्या पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले. तेव्हा त्यांनी सांगितले की, महात्मा फुले योजनेअंतर्गत रक्कम मिळत होती. परंतु, साडेतीन ते चार लाख रुपये पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणार आहे आणि आम्ही ती व्यवस्था करू शकलो नाही म्हणून खूप काळजीत होतो.



त्यात
श्वास फाऊंडेशनबाबत माहिती समजली व येथे काम झाल्याची भावना त्यांनी पेशकार यांच्यासमोर व्यक्त केली. आजपर्यंत ‘श्वास फाऊंडेशन’ सुमारे ६० हजार लाभार्थी म्हणजेच १५ ते १६ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात वैयक्तिक लाभाच्या अशा २० ते २२ योजना घेऊन ‘श्वास फाऊंडेशन’चे कार्यकर्ते या कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहेत. कोणती योजना कुटुंबातील कोणत्या सदस्यांना लाभदायी असेल, हे ठरवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देणार आहे. ‘सबका साथ, सबका विश्वास’ या मंत्रानुसारच सर्व स्तरातील, सर्व धर्मातील कुटुंबांपर्यंत या योजना पोहोचविण्याचा मानस पेशकार आणि वाघ यांनी व्यक्त केला. ‘श्वास फाऊंडेशन’चे नाव समर्पक ठरले असून अनेक रुग्णांना निरोगी आणि निरामय आयुष्याचा श्वास देण्यात ‘श्वास फाऊंडेशन’ यशस्वी होत असल्याची भावना पेशकार यांनी यावेळी व्यक्त केली. सकाळी १० ते रात्री ७ या काळात ‘श्वास फाऊंडेशन’च्या कार्यालयात आपल्या ब्रीदनुसार ”श्वासागणिक आनंद देणारी माणसं’ अविरत सेवा बजावत आहेत.



राजकीय कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख कार्य केल्यास समाधान प्राप्त होण्याबरोबरच सेवा घडण्यासदेखील हातभार लागत असल्याचे पेशकार यांनी यावेळी सांगितले
. या कामात प्रेरणा व ऊर्जा देण्याचे कार्य डॉ. विनायक गोविलकर यांनी केले असून पहिली देणगी उद्योजक खुशाल पोद्दार यांनी दिली आहे. तसेच उद्योजक राजेश मुनोत, विवेक गोगटे, आनंद सूर्यवंशी, नामकर्ण आवारे, उमेश परदेशी, हेमंत देवरे अशा अनेकविध नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. आगामी वर्षात २० योजना व १५ हजार कुटुंबे हेच ध्येय बाळगून काम केले जाणार आहे. सध्या नाशिकमध्ये २७ रुग्णालये वेगवेगळ्या आजारांसाठी या योजनेमध्ये समाविष्ट झाली असून या योजनांचा लाभ रुग्णांना ‘श्वास फाऊंडेशन’च्या माध्यमातून देण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@