काशीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणात स्थगितीची याचिका रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2020
Total Views |


Kashi Vishwanath Temple_1


वाराणसी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अयोध्येतील राम मंदिराचा खटला निकाली निघाल्यानंतर काशी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरणही लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.वाराणसीतील जलदगती न्यायालयाने याप्रकरणी मुस्लीम पक्षकारांची स्थगितीची याचिका गुरुवारी रद्दबातल ठरवली.



उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डासाठी हा निर्णय फार मोठा झटका मानला जात आहे
. या प्रकरणात स्वयंभू भगवान विश्वनाथ न्यास आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड हे दोन्हीही याचिकाकर्ते आहेत. येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी पुरातत्त्व खात्याच्या विभागाला देण्यात येणार्‍या संशोधन प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी मुस्लीम पक्षकारांकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत सुन्नी वक्फ बोर्डाला झटका दिला आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले असून याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@