... तर मी काश्मीरमध्येही भाजपचा प्रचार करेन : दि ग्रेट खली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2020
Total Views |


khali_1  H x W: 

 
 
 
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. 'डब्ल्यूडब्ल्यूएफ' सुपरस्टार दि ग्रेट खली भाजपकडून स्टार प्रचारक म्हणून रिंगणात उतरला आहे. गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उरलेल्या काही तासांमध्ये सर्वच पक्षांकडून टिच्चून प्रचार केला जात आहे. भाजप उमेदवार सुमन गुप्ता यांच्यासाठी त्याने भाजपच्या प्रचार फेरींमध्ये सहभाग घेतला.
 
 
 
"सध्या विरोधी पक्ष ज्या प्रकारचे वातावरण देशभरात तयार करत आहेत, ते पाहता गरज पडली तर मी काश्मीरमध्येही प्रचार करेन." असेदेखील त्याने सांगितले. तसेच पुढे "निवडणुकीच्या निमित्ताने देशातील लोकांना भेटता येते. पुढेही देशाची सेवा करण्याची संधी मिळू शकते." असेदेखील त्याने सांगितले. दिल्लीमध्ये चांदणी चौक हा सर्वांत लहान विधानसभा मतदार संघ आहे. या जागेसाठी भाजपने सुमन गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. ते यापूर्वी नगरसेवक राहिले आहेत. या मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या माजी आमदार अलका लांबा आता काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरल्या आहेत. तर, आम आदमी पक्षाकडून प्रह्लाद सिंह साहनी यांना तिकीट मिळाले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@