मुख्यमंत्र्यांच्या ठाणे दौऱ्याआधी शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2020
Total Views |


TMC Thane_1  H

 
 
 
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी ठाणे दौऱ्यावर जाणारा आहेत. परंतु, याआधीच तेथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. कारण ठरले आहे ते म्हणजे तेथे उभे राहणारे सायन्स पार्क. ठाण्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटवून त्यावर सायन्स पार्क उभारले जाणार आहे. या सायन्स पार्कचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे. जर हे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले तर आम्ही राजीनामा देऊ अशी धमकी ठाण्यातील चार शिवसेना नगरसेवकांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर बसल्यावर पहिल्यांदा ठाणे दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
 
शिवसेनेचे ठाण्यातील ४ नगरसेवक संजय भोईर, देवराम भोईर, उषा भोईर आणि भूषण भोईर यांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून प्रशासन हा प्रकल्प राबविणार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे, अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले जाणार आहे. यामध्ये ढोकाळी भागात २० एकर सुविधा भुखंडावर खेळासाठी क्रिडागंणाचे आरक्षण टाकण्याचा प्रस्तावाची सूचना २०१७ मध्ये मंजुर करण्यात आली होती. परंतु असे असतानाही कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता पालिका प्रशासनाने त्याच जागेवर आता सायन्स पार्क अर्बन जंगल उभारण्याचा घाट घातला आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. यावर ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी सांगितले की, "क्लस्टर योजने अंतर्गत हे केलं जात असून काही नगरसेवकांचा गैरसमज झाला आहे. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करावी."
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@