चीनमध्ये नवजात बाळाला ‘कोरोना’ची लागण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2020
Total Views |
corona baby_1  





चीनच्या ‘कोरोना’चा जगभरात हाहाकार; जपानमध्येही कोरोनाचे १० रुग्ण

चीन : चीनमध्ये कोरोना व्हायरसचे थैमान सुरूच असून या व्हायरसचे केंद्रस्थान असलेल्या वुहान शहरामध्ये एका नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या ३० तासांमध्ये या जीवघेण्या व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चीनच्या सरकारी मीडियाने बुधवारी याबाबत माहिती दिली.


नवजात बालकाला आईच्या गर्भात किंवा जन्म झाल्यानंतर लगेचच संक्रमण झाल्याची शक्यता आहे. बालकाला जन्म देण्याआधी आईचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले होते. तज्ज्ञांनुसार ही घटना ‘व्हर्टिकल ट्रान्समिशन’चा प्रकार असू शकते. अशाप्रकारच्या घटनांमध्ये आईद्वारे गर्भात किंवा बाळाच्या जन्मानंतर व्हायरसची लागण होते.


चीनमध्ये करोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, करोनागग्रस्त रुग्णांची संख्या २४,३२४ वर पोहोचली आहे तर, बळींची संख्या ४९० वर पोहोचली असल्याची माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून बुधवारी देण्यात आली होती. पंरतू आता बळींची सख्या वाढली असून ५६३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. चीनच्या बाहेर देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून आतापर्यंत १८२ रुग्णांची नोंद झाली आहे. जापानमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जहाजावरील विलगीकरण कक्षात ठेवलेले जपानमधील किमान १० प्रवासी करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@