शाहीन बाग आंदोलनात कॉंग्रेस-आपचा हात ; ईडीचा दावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2020
Total Views |


शाहीन बाग _1  H


नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी सक्तवसुली संचलनालयाने शाहीन बाग आंदोलनाबाबतीत मोठा खुलासा केला आहे. शाहीन बाग येथे सुरु असणाऱ्या नागरिकत्व सुधार कायद्याविरोधी (सीएए) निदर्शनात देशविरोधी शक्तींचा हात असल्याचा दावा ईडीने केला आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (पीएफआय) शाहीन बाग आंदोलनास अर्थसहाय्य दिले असल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच यात आपसह कॉंग्रेस नेत्यांचा देखील पीएफआयशी संपर्क असल्याचा दावा केला आहे.



ईडीने दावा केला आहे की कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) नेते पीएफआय अध्यक्षांशी संपर्कात होते. ईडीच्या तपास यंत्रणेनुसार आपचे नेते संजय सिंग यांनी पीएफआय नेते मोहम्मद परवेझ अहमद यांची भेट घेतली होती. तसेच मोहम्मद परवेझ अहमद फोन कॉल आणि व्हॉट्सअ‍ॅपवरुन संजय सिंग यांच्या संपर्कात होते.



आप नेते संजय सिंग यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मी रोज हजारो लोकांना भेटतो. ईडी किंवा सीबीआयकडे माझ्याविरूद्ध काही पुरावे असल्यास
, कारवाई करा.” शाहिन बागच्या आंदोलनामागे पीएफआय नेते मोहम्मद परवेझ यांचा हात असल्याचे ईडीने उघड केले आहे. ईडीने हा देखील दावा केला आहे कि, पीएफआयचे मोहम्मद परवेझ अहमद उदित राज यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांशी देखील संपर्कात आहे.



यूपीतील हिंसाचारासाठी पीएफआयने अर्थसहाय्य केल्याचे  उघड झाले होते

उत्तर प्रदेशमध्येही सीएएच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलन व हिंसाचारात ईडीने पीएफआयचाच हात असल्याचा दावा केला होता. सीएएच्या निदर्शनादरम्यान ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या ठिकाणी पीएफआयशी जोडलेल्या लोकांचा यात हात असल्याचे स्पष्ट झाले होते, असा दावा ईडीने केला आहे. यासंबंधी अहवालात दावा करण्यात आला आहे की, ७३ बँक खात्यात १२० कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. या निधीचा उपयोग निदर्शनात करण्यात आला. मात्र पीएफआयने हे अहवाल नाकारले होते.

@@AUTHORINFO_V1@@