निसर्ग व मानवजातीसाठी अविरत कार्यरत : सोहम फाऊंडेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2020
Total Views |


soham, foundation _1 



उल्हासनगर : गोरगरीब, गरजू व दिव्यांग बांधवांची सेवा हीच ईश्वरसेवा, हे ब्रीदवाक्य घेऊन दिव्यांग, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, वनवासी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आपत्तीग्रस्तांना मदत तसेच पर्यावरण आणि पक्ष्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरात स्थापित सोहम फाऊंडेशन सध्या संपूर्ण महाराष्ट्रात समाजविधायक काम करत आहे.


सोहम फाऊंडेशन ही संस्था काही वर्षांपूर्वी उल्हासनगरात प्राध्यापक राजेंद्र देठे यांनी आपल्या काही सहकार्
‍यांना सोबत घेऊन स्थापन केली. समाजातील वंचित व गरजू लोकांना साहाय्य करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. यामार्फत संस्थेतर्फे दोन महिला बचतगट स्थापन करून महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येते. दिव्यांगांना शासकीय दाखले काढून देण्यात येतात. यासाठी महिन्याच्या प्रत्येक बुधवारी संस्थेचे स्वयंसेवक जातीने शासकीय दवाखान्यात हजर राहून त्यांना व रुग्णालय प्रशासनाला मदत करतात. आत्तापर्यंत १४०० लोकांना अपंग दाखले मिळवून देण्यात आले.



दिव्यांग बांधवांना पेन्शन योजना मिळावी
, यासाठी संस्था प्रयत्नशील राहून बर्‍याच दिव्यांगांना पेन्शन मिळवून देण्यात आले. जे अपंग आर्थिक कमकुवत असतील त्यांना व्हीलचेअर, ट्राय सायकल, जयपूर फूट, वॉकर असे साहित्य मोफत वाटप करण्यात येते. मुरबाड परिसरातील बनवासी पाड्यात जाऊन कपडे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश मोफत वाटप करण्यात येतात. नैसर्गिक आपत्तीप्रसंगी सोहम फाऊंडेशनच्या वतीने भरीव कामगिरी बजावत उल्हासनगरला लागून असलेल्या म्हारळ, वरप व कांबा परिसरात पूरग्रस्त नागरिकांना कपडे व जेवणाचे वाटप तसेच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर दिवा व सांगली जिल्ह्यात जाऊन तेथील पूरग्रस्तांना मदतीचा हात त्यांनी दिला.



गोरगरीब मुलांना चांगल्या नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठीही नित्य प्रयत्न सुरू आहेत
. आज सोहम फाऊंडेशन महिला बचतगट, रॉयल महिला बचतगट संस्थेच्या महिला सदस्य आज तितक्याच उत्साहाने कार्य करत आहेत. कल्याणजवळील नंदादीप या अनाथ मुलांच्या आश्रमातील बालकांना मदतीचा हात देऊन त्यांना भविष्यकाळात चांगले नागरिक बनविण्याचा प्रयत्न करत आहे. संस्थेचे उल्हासनगरात ७५ स्वयंसेवक असून महाराष्ट्रात चौदा जिल्ह्यात संस्थेचे स्वयंसेवक काम करत आहेत. प्रत्येक सभासद महिन्याला आपल्या पगारातील काही हिस्सा या सामाजिक कार्यासाठी जमा करतात. सोहम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, प्राध्यापक राजेंद्र आनंद देठे व त्यांचे सहकारी भरत टोपले, राकेश मोरे, नरेश श्रीगिरी, मनिषा राव, जया गंगावणे, वैशाली पोळ, मीना फर्डे, लक्ष्मण बोराडे, रवींद्र ढगे, दिपाली राऊत, कविता जाधव, करुणा लेदे, अभिमन्यू भोसले, राजेश मोरे, वैभव बंडे, मायकल भंडारी, कविता देठे, उषा वाघ, शुभम पोळ, मीना बोराडे, माया ढगे...असे असंख्य हात संस्था परिवाराचा भाग असल्याचे संस्थेचे जनसंपर्क प्रमुख नारायण बी. वाघ यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले.


-
शिवाजी वाघ

@@AUTHORINFO_V1@@