महाराष्ट्रातील पक्ष्यांच्या यादीत भर; प्रथमच आढळला 'हा' पक्षी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020   
Total Views |
tiger_1  H x W:
 
 
 

 कोयनेच्या खोऱ्यात आढळला  पक्षी

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रातील पक्ष्यांच्या यादीत 'लार्ज हाॅक कुक्कु' पक्ष्याची भर पडली आहे. कोयनेच्या खोऱ्यात हा पक्षी आढळला असून महाराष्ट्रात त्याचे प्रथमच दर्शन घडले आहे. हा पक्षी हिवाळ्यात हिमालयातून स्थलांतर करुन पश्चिम घाटामध्ये येतो.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या कोयनेच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या पक्ष्यांच्या यादीत नव्या पक्ष्याची भर केली आहे. 'लार्ज हाॅक कुक्कु' हा हिमालयात अधिवास करणारा पक्षी आहे. सामान्यपणे हा पक्षी हिवाळ्यात पश्चिम घाटामध्ये स्थलांतर करतो. आजतागायत त्याची नोंद मध्यप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि केरळ राज्यामधून करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आढळून आला. २६ फेब्रुवारी, २०१९ रोजी 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'तील पक्षी सर्वेक्षणादरम्यान 'कोयना अभयारण्या'जवळील ढाणकल गावातील कापना नदीच्या पात्रात कोयना 'निसर्ग संवर्धन व पर्यावरण पर्यटन संस्थेटचे सचिन धायगुडे, राहुल यादव आणि गणेश मोरे यांना हा पक्षी दिसला. त्यांनी या पक्ष्याचे छायाचित्र टिपून त्यावर शास्त्रीय टिपण लिहण्यास सुरुवात केली.
 
 
 
 
 
महाराष्ट्रात प्रथमच आढळलेल्या लार्ज हाॅक कुक्कुविषयीचा शोधनिबंध १६ जानेवारी रोजी 'इंडियन बर्ड्स' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्याची माहिती सचिन धायगुडे यांनी दिली. या प्रजातीचा एक पक्षी २००२ मध्ये मुंबईतील एका रहिवाशाने पिंजराबंद अवस्थेत 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ला (बीएनएचएस) सुपूर्द केल्याची माहिती आम्हाला 'बीएनएचएस'च्या सरस्वती उन्नीथन यांनी दिल्याचे धायगुडे यांनी सांगितले. चोची खालील विशिष्ट काळा ठिपका, छातीवरील तपकीरी लालसर रंग आणि त्यावरील गडद पट्ट्यांमुळे हा पक्षी ओळखता येतो. गेल्या तीन वर्षांपासून 'कोयना निसर्ग संवर्धन व पर्यावरण पर्यटन संस्था' कोयना अभयारण्य परिसरात निसर्ग संवर्धन, संशोधन व लोकांना निसर्गाप्रती जागृत करण्याचे काम करत आहे. या पक्ष्यावर प्रकाशित झालेला शोधनिबंध संस्थेसाठी खूप मोठे यश असल्याचे, धायगुडे म्हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@