सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येच्या देशात पहिले हिंदू विद्यापीठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |


indinesia_1  H



नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये पहिले हिंदू विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. हिंदू धर्म स्टेट इन्स्टिट्यूट नावाने चालू असलेल्या शिक्षणसंस्थेचे नाव बदलून आता ‘आय गस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी’ असे ठेवण्यात आले आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी एका अध्यादेशाद्वारे हा निर्णय जाहीर केला.



उल्लेखनीय म्हणजे इंडोनेशियात सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असली तरी तिथल्या संस्कृतीमध्ये रामायण रुजलेले आढळते
. इथली रामलीलादेखील जगभरात प्रसिद्ध आहे. आताच्या हिंदू विद्यापीठ सुरू करण्यामागचा उद्देश हिंदू उच्च शिक्षणाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुग्रीव हिंदू विद्यापीठात अ‍ॅडमिनिस्टर हिंदू हायर एज्युकेशन प्रोग्रामसह हिंदू हायर एज्युकेशन प्रोग्रामला साह्यकारी ठरणारे अन्य अभ्यासक्रमदेखील शिकवले जातील.



विद्यापीठाचे रेक्टर आय गस्ती नगुराह सुदियाना यांनी अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती दिली आहे
. इंडोनेशियातील हिंदूंसाठी हा ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण असून राष्ट्रपती विडोडो यांनी बालीमध्ये हिंदू शैक्षणिक संस्थांवर विशेषत्वाने लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सदर इन्स्टिट्यूटची स्थापना १९९३ साली हिंदू धर्माच्या शिक्षणासाठी एका राज्यस्तरीय अकादमीच्या रूपात झाली होती. नंतर १९९९ साली त्याचे रूपांतर हिंदू रिलीजन स्टेट कॉलेजमध्ये आणि २००४ साली हिंदू धर्म स्टेट इन्स्टिट्यूटमध्ये तर आता नव्या अध्यादेशानुसार आय गस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@