पंतप्रधानाची मोठी घोषणा : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |

pm modi_1  H x
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये राम मंदिराबाबत एक मोठी घॊशन करण्यात आली. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.
 
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले की, "आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश समोर ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या स्थापनेचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. अयोध्यामधील रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याची ट्रस्टवर जबाबदारी असेल. आम्ही उत्तर प्रदेश सरकारकडे सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्याची विनंती केली होती. सरकारने ती मान्य केली आहे."
 
६७ एकर जमीन हस्तांतरित केली जाईल
 
अयोध्या कायद्यांतर्गत अधिग्रहीत ६७ एकर जमीन ट्रस्टकडे हस्तांतरित केली जाणार आहे. यासोबतच योगी सरकार अयोध्येत मस्जिद निर्माणासाठी ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाकडे सुपुर्द करण्याची मंजुरी देणार आहे. जमीन वाटपाचे पत्रही मंडळाला सादर केले जाणार आहे. अयोध्या जवळील लखनऊ महामार्गावर रौनाही येथील धन्नीपूर येथे चिन्हांकित केलेली ५ एकर जमीन वक्फ बोर्डाला देण्याची शक्यता आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@