संस्कारभारती पनवेल आयोजित ‘कलांजली’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |
kalanjali_1  H


मुंबई :
संस्कारभारती कोकण प्रांत, पनवेल समितीच्या वतीने दि. ९ फेब्रुवारी रोजी ‘कलांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत, नृत्य, साहित्य, रांगोळी, चित्रकला या कला विभागांतर्फे सर्वश्री ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके आणि पु.ल. देशपांडे या त्रिमूर्तीना आदरांजली म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

गदिमा, बाबूजी आणि पुलं या महाराष्ट्राच्या रत्नत्रयींना ही शब्दमयी आदरांजली असणार आहे. नाट्य, कविता आणि गाणी, चित्र प्रदर्शन असे कलाविष्कार संस्कार भारतीचे कलाकार सादर करणार आहेत. ‘बटाटयाची चाळ’ या नाट्यछटेचं सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. अरुण नलावडे यांची विशेष उपस्थिती राहिल. रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी वासुदेव बळवंत फडके नाट्य मंदिरात रात्री ८.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@