श्रीराम जन्मभूमी ट्रस्टवर एक विश्वस्त दलित समाजाचा : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |


amit shah_1  H



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य आणि दिव्य असे राम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केल्यानंतर या ट्रस्टमध्ये कोणाचा समावेश असेल, याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती दिली आहे. या ट्रस्टमध्ये एकूण १५ विश्वस्त असणार आहेत. त्यांपैकी एक विश्वस्त नेहमीच दलित समाजातील व्यक्ती राहणार आहे, असे शहा यांनी जाहीर केले आहे.



केंद्रीय गृहमंत्री हे आपल्या ट्वीमध्ये म्हणाले, “श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये १५ विश्वस्त असतील
, त्यातील एक विश्वस्त नेहमी दलित समाजातील असेल. सामाजिक समतेला बळकट करणाऱ्या अशा अभूतपूर्व निर्णयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो.”

 




पुढे ते म्हणतात कि, “मंदिर निर्माणाबाबत सर्व प्रकारचे निर्णय घेण्यासाठी हे ट्रस्ट पूर्णपणे स्वायत्त असेल, असे शहा यांनी स्पष्ट केले आहे. या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याचेही शहा म्हणाले. कोट्यवधी लोकांच्या दशकांपासूनची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येईल असा मला पूर्ण विश्वास आहे, असेही शहा म्हणाले.

 

@@AUTHORINFO_V1@@