कर्करोगाच्या विळख्यात भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020   
Total Views |


cancer _1  H x



सुदृढ, सशक्त आणि सक्षम भारतीय नागरिक असलेला भारत असण्यात कर्करोग हा एक मुख्य अडथळा ठरत असल्याचेच सध्या दिसून येते. भारतात जागतिक पातळीचा विचार केल्यास कर्करोगाचे प्रमाण हे ८६ टक्के आहे तर, ४० टक्के लोक हे तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगाचे बळी ठरत आहेत.


कर्करोग हे २०२० या वर्षातील आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे
. नुकताच ’जागतिक कर्करोग दिन’ जगभरात साजरा करण्यात आला. यावेळी जागतिक स्तरावर फैलावणारा कर्करोग, त्यामागील कारणे, त्यावरील उपाय याबाबत बराच ऊहापोह झाला. यातच तोंडाच्या कर्करोगात भारत आजही तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे वास्तव समोर येत आहे. नाशिक येथील मानवता क्युरी कॅन्सर हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राचे डॉ. राज नगरकर यांच्या माहितीनुसार, भारतात तोंडाचा कर्करोग होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखूसेवन. भारतीय नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात ‘कर्करोग’ हा एक प्रमुख घटक आहे. भारतात कर्करोगावर अनेकविध उपचार उपलब्ध आहेत. तसेच, या उपचार पद्धती सर्वसामान्यांना परवडाव्यात यासाठी शासकीय स्तरावरदेखील अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी सुदृढ, सशक्त आणि सक्षम भारतीय नागरिक असलेला भारत असण्यात कर्करोग हा एक मुख्य अडथळा ठरत असल्याचेच सध्या दिसून येते. भारतात जागतिक पातळीचा विचार केल्यास कर्करोगाचे प्रमाण हे ८६ टक्के आहे तर, ४० टक्के लोक हे तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगाचे बळी ठरत आहेत.



कर्करोगग्रस्त देशांचा क्रम लावला तर पहिला आणि दुसरा क्रमांक हा अनुक्रमे चीन आणि अमेरिका यांचा लागतो
. एकट्या भारतात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण हे जवळपास ९० टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे भारत हा आगामी काळात ‘कर्करोगाची राजधानीम्हणून जगभरात आपली ओळख निर्माण करण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली. तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी ‘लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’ या जागतिक पातळीवर कार्यरत संस्थेच्या माध्यमातून गर्भाशयाच्या कर्करोगाविषयीचा एक अहवाल नुकताच जारी करण्यात आला. त्यानुसार सन २०१८ मध्ये भारतात सर्वाधिक मृत्यू हे कर्करोगामुळे ओढवले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कर्करोगतज्ज्ञांचा हा अहवाल किंवा त्यांची अभ्यासपूर्ण मते उद्धृत करण्यामागे भय निर्माण करणे हा उद्देश मुळीच नाही, तर वास्तव समोर आणणे हाच एक उद्देश आहे. कर्करोगावर उपचार उपलब्ध आहेत. अनेक नागरिकांनी कर्करोगावर मात करत आपल्या आयुष्यास निरामय आणि निरोगिता यांचे वलय प्रदान केल्याचे उदाहरणदेखील भारतीय समाजात आहे. भारतात कर्करोगावर मात करण्यासाठी गरज आहे, ती सामाजिक जनजागृती आणि व्यसनाधीनता टाळण्याची.



डॉ
. नगरकर यांच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात बाळ जन्माला आले की, त्याला कर्करोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्यामुळे तेथे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. भारतातदेखील या उपचार पद्धतीचा अवलंब होत आहे. मात्र, पूर्वी जन्माला आलेली आणि आज तारुण्यात पदार्पण केलेल्या तरुण पिढीस ही लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना कर्करोगाचा धोका संभवू शकतो. शरीरातील इतर अवयवांना होणारा कर्करोग रोखणे हे जरी सहजासहजी हातात नसले तरी, व्यसनाधीनता टाळून तोंडाचा कर्करोग आटोक्यात आणणे, हे तरी आपल्या सर्वांच्या हातात नक्कीच आहेपुरुषांना होणार्‍या पाच प्रमुख कर्करोगांमध्ये गळ्याचा कर्करोग, फुप्फुसाचा आणि अन्ननलिकेचा, स्वरयंत्राच्या कर्करोगाचा समावेश आहे. या सर्व कर्करोगांना ४० टक्के तंबाखू सेवन जबाबदार आहे. विविध माध्यमांतून केल्या जाणार्‍या पान मसाल्याच्या जाहिराती, त्या अनुषंगाने वाढणारी विक्री यावर सरकारी पातळीवर नियंत्रण होणे आवश्यक आहे.



२५ टक्क्यांपेक्षा जास्त पुरुषांचा तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो
. तर, २५ टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया तोंड आणि स्तनाच्या कर्करोगाने मरण पावतात. तंबाखूला प्रतिबंध करून ९० टक्के कर्करोग थांबवता येणे सहज शक्य आहे. भारतासमोर कर्करोग जरी एक आव्हान असले तरी, त्यावर नियंत्रण मिळविणे आणि महासत्तेच्या उंबरठ्यावर निरोगी निरामय जीवन जगत भारताला आरोग्यदृष्ट्या सक्षम राखणे, हे भारतीय म्हणून आपले सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे.

@@AUTHORINFO_V1@@