हा अनुराग नव्हे, मोदीराग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020   
Total Views |



anurag kashyap_1 &nb



सरकारला
‘खलनायक’ ठरवत हे सरकार कसे दडपशाहीवादी, अल्पसंख्याकविरोधी आहे, याचे सुरस कथानकच रचले. ‘रिल’ आणि ‘रिअल’ लाईफमध्ये एक पुसट रेषा असते, पण अनुरागच्या डोळ्यात इतका जहाल अंगार पेटलाय की, त्याला मोदीद्वेषासमोर काही दिसेल तर नवल !


‘अनुराग’ म्हणजे प्रेम, आपलुकीची भावना. पण, बॉलीवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप मात्र आपल्याच नावाला जागलेला नाही. कारण, अनुरागचा ‘राग’ हा काही साधासुधा ‘राग’ नाही, तर त्याला महाभयंकर अशा ‘मोदीरागा’नेच ग्रासलेले दिसते. मोदी सरकारच्या सर्वच धोरणांना अनुरागने ट्विटरवरून विरोध करत वेळोवेळी कंठशोष केला. ‘सीएए’, ‘एनआरसी’ वरूनही अनुरागने अगदी खालच्या शब्दांत केंद्र सरकारला ‘खलनायक’ ठरवत हे सरकार कसे दडपशाहीवादी, अल्पसंख्याकविरोधी आहे, याचे सुरस कथानकच रचले. ‘रिल’ आणि ‘रिअल’ लाईफमध्ये एक पुसट रेषा असते, पण अनुरागच्या डोळ्यात इतका जहाल अंगार पेटलाय की, त्याला मोदीद्वेषासमोर काही दिसेल तर नवल ! या अनुरागची मध्यंतरी इतकी मजल गेली होती की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चक्क ट्विटरवर प्राण्याची उपमा देऊन तो मोकळा झाला.



सध्या चित्रपटनिर्मितीऐवजी ट्विटनिर्मितीतच धन्यता मानणारा अनुराग चक्क कुणाल कामराच्या समर्थनार्थ उतरला
. ज्या ‘इंडिगो एअरलाईन्स’ने कामरावर अर्णब गोस्वामीशी विमानात घातलेल्या वादामुळे उड्डाणाची मनाई केली, त्यावर म्हणे अनुरागने बहिष्कार टाकला. आता अनुरागने ‘इंडिगो’च्या विमानात तिकीट बुक केले नाही म्हणून त्याच्या समर्थनार्थ त्याचे चाहते हीच कृती करतील, असा कदाचित त्याचा गोड गैरसमजही असावा. पण, त्याने ‘इंडिगो’ला किंवा कुठल्याही एअरलाईन्सला काय फरक पडणार म्हणा! परंतु, तरीही विरोधासाठी विरोधाचे झेंडे फडकावत राहायचे आणि आपला ‘मोदीराग’ कसा रास्त, याचे जगाला दर्शन घडवून आणण्यातच अनुरागला धन्यता वाटते. दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांतनेदेखील नुकतेच ‘सीएए’चे समर्थन केले. आता त्यावरूनही अनुरागला राग अनावर झाला. बॉलीवूडचे सेलिब्रिटी ‘सीएए’चा वापर आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी करत असल्याचा अजब तर्क अनुरागने कसा लढवला कोणास ठावूक. पण, यांचे म्हणजे दीपिका जेएनयुमध्ये जाऊन गपचूप मोर्चात सहभागी झालेली चालते, मग रजनीकांतने ‘सीएए’ला समर्थन दिले तर बिघडले कुठे? असा हा विरोध आणि समर्थनाचा अनुरागचा अजब दुटप्पीपणा! तेव्हा, अनुराग आणि त्याच्यासारख्या रिकामटेकड्या बॉलीवूडकरांनी राजकारणावर फक्त चित्रपटच काढावेत, ते लोक चवीने बघतीलही, पण देशाच्या राजकारणात नसती ढवळाढवळ आणि उठाठेवी करू नये, एवढेच!



तरीही
‘लव जिहाद’ आहेच!


लव जिहाद
म्हणजे नेमके काय, हे धंदे गुपचूप कसे चालतात हे यापूर्वी अनेक प्रकरणांमधून उघडकीस आले आहेच. संबंधितांवर कारवाईही झाली. कशा पद्धतीने हिंदू, ख्रिश्चन मुलींना फसवून मुस्लीम तरुणांकडून फसवून धर्मांतरण, लग्नासाठी दबाव टाकलो जातो, याच्या भयंकर कथाही अंगावर काटा आणणार्‍या. मुस्लीम मुलांना यासाठी धर्मसंस्थांकडून कसे पैशाचे, दुचाकीचे आमिष मिळते, त्यांची माथी कशी भडकावली जातात वगैरे तथ्येही अशाच प्रकरणांमधून वेळोवेळी उजागर झाली. त्यामुळे ‘लव जिहाद’चे अस्तित्व नाकारण्याचा किंवा असा कुठलाच प्रकार देशात होत नसल्याचे म्हणणे वरकरणी चुकीचे ठरेल. पण, आज हा प्रश्न उपस्थित करण्याचे प्रयोजन म्हणजे केरळच्या एका काँग्रेस खासदाराने यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर खुद्द गृहमंत्रालयाने दिलेले लेखी उत्तर.



केरळचे काँग्रेसचे चालकुडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बेनी बहानन यांनी हा प्रश्न संसदेत उपस्थित केला
. त्याला गृहमंत्रालयातर्फे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, “कायद्याच्या चौकटीत कुठेही ‘लव जिहाद’ असा शब्दप्रयोग नाही. कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणेतर्फे असा कुठलाही खटला नोंदविण्यात आलेला नाही. परंतु, राष्ट्रीय तपास यंत्रणेने केरळमधील आंतरधर्मीय विवाहाच्या दोन प्रकरणांचा तपास केला आहे.” गृहमंत्रालयाच्या या स्पष्टीकरणानंतर लगेचच काही पुरोगामी मंडळींनी ‘लव जिहाद’ हे कसे हिंदूंनीच केलेला अपप्रचार होता, हिंदू संघटनांनी याबाबत मुद्दाम भ्रम पसरविण्याचा कसा प्रयत्न केला वगैरे पोपटपंचीही सुरू केली. पण, निश्चितच विरोधकांच्या दाव्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. कायदाच्या चौकटीत अद्याप ‘लव जिहाद’ला स्थान नाही, याचा अर्थ असे प्रकार घडलेच/घडतच नाही, असा त्याचा अर्थ लावण्याचा आततायीपणा, आगाऊपणा करणार्‍यांची कीव करावी तेवढी कमीच! कारण, गाजलेले अखिला ऊर्फ हादियाचे प्रकरण असो वा केरळच्या सिरो मलबार कॅथलिक चर्चनेही यासंबंधी दाखल केलेले आक्षेप असो, यावरुन ‘लव जिहाद’चे षड्यंत्र वारंवार सिद्धही झाले आहे. त्यामुळे धर्माच्या नावावर झालेल्या या फसवणुकीला कायद्याने ‘लव जिहाद’चे नाव द्यावे अथवा नाही, परंतु त्याआड होणार्‍या या कटुसत्याकडे कानाडोळा करुन चालणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@