देशासोबत उभे राहणारे सरकार दिल्लीत हवे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020
Total Views |
modi_1  H x W:





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी जाहीर सभा मंगळवारी दिल्लीतील द्वारका येथे पार पडली.


नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : देशावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताच्या बाजूस कमजोर करणारे, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सरकार दिल्लीत नको. गरज असताना देशासोबत, भारतीय सैन्यासोबत समर्थपणे उभे राहणारे सरकार दिल्लीत असणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी जाहीर सभा दिल्लीतील द्वारका भागात मंगळवारी झाली. त्यावेळी पंतप्रधानांनी आपसह विरोधी पक्षांचा समाचार घेतला.


दिल्लीच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवला होता आणि आता त्याच विश्वासावरून आता दिल्लीमध्येही परिवर्तन घडणार आहे. दहशतवाद्याविरोधात सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक केल्यानंतर कशाप्रकारच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, ते प्रत्येक दिल्लीकर नागरिकाने बघितले असून त्यांच्यामध्येही राग निर्माण झाला आहे. आता ८ तारखेला मतदानाच्या दिवशी हा राग व्यक्त करून दिल्लीकर नागरिक त्यांना योग्य ती शिक्षा देतील. देशावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताच्या बाजूस कमजोर करणारे, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सरकार दिल्लीत नको. गरज असताना देशासोबत, भारतीय सैन्यासोबत समर्थपणे उभे राहणारे सरकार दिल्लीत असणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


भाजपच्या बाजूने जनादेश येणार असल्याचे वातावरण दिल्लीत तयार झाले असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दिल्लीची निवडणूक म्हणजे नव्या दशकातील पहिली निवडणूक आहे. भारताच्या प्रगतीचे हे दशक ठरणार असून त्यासाठी जनतेच्या या निवडणुकीतील निर्णय अतिशय महत्वाचा ठरणार आहे. भारताच्या प्रगतीसाठी निर्णय घेणाऱ्यांचा एक पक्ष तर त्या निर्णयांना विरोध करणाऱ्यांचा दुसरा पक्ष असे दिल्लीत स्पष्टपणे दिसते आहे. दिल्लीमध्ये दोष देणारे नव्हे, तर दिशा देणारे सरकार गरजेचे आहे. विकासाच्या राजकारणात अडथळे आणणारे आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांपासून मुक्ती गरजेची आहे. विकास योजना राबविणारे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यावर काम करणारे सरकार दिल्लीत सत्तेत येणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@