सोनिया गांधींची प्रकृती अस्थिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020
Total Views |
sonia gandhi_1  




सर गंगाराम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली माहिती

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रविवारी दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी सोमवारी त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती दिली. सोनिया गांधींची तपासणी सुरू असून, पोटात संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे कॉंग्रेस प्रमुख सोनिया गांधी शनिवारी बजेट सादर करीत असताना संसदेत उपस्थित नव्हत्या.


याआधीही सोनिया गांधी यांच्यावर सर गंगाराम रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सोनिया गांधी या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या. अचानक पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावरून काही काळ दूर झाल्या होत्या. त्यांच्या जागी राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांची मनधरणीही करण्यात आली. परंतु, ते आपल्या निर्णयावर ठाम होते. मात्र, काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली होती.
@@AUTHORINFO_V1@@