अर्थसंकल्पानंतर मंगळवारी शेअर बाजार तेजीत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020
Total Views |
share market_1  





सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला

मुंबई : आज दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास ४०० अंकांनी उसळला असून निफ्टीमध्येही १११ अंकांची झेप पाहायला मिळाली. रिलायन्स, आयटीसी, टीसीएस सगळ्या बड्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदीची लाट आज शेअर बाजारात पाहायला मिळाली.


बजेटच्या दिवशी शेअर बजारात घसरणी दिसली होती. पण मंगळवारी शेअर बाजार पुन्हा एकदा चांगल्या अंकांनी उघडला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सेन्सेक्स २०६ अंकानी वाढून ४०,१७८ वर पोहोचला. सकाळी १०.२२ मिनिटांनी सेंसेक्स ५६० अंकानी वाढला. निफ्टीने देखील ११,८०० अंक पार केले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजही ६२ अंकानी वाढून ११,७८६.२५ वर उघडला.


शनिवारी बजेटच्या दिवशी शेअर मार्केट १००० अंकानी खाली गेला होता. सेन्सेक्सही ३९,७३५.५३ वर बंद झाले होते. बजेटमुळे शेअर बाजारात नाराजी पाहायला मिळाली. कारण या बजेटमध्ये कोणत्याही सेक्टरला पुढे नेण्यासाठीची तरतूद दिसली नव्हती. आरआयएल, टीसीएस, टाटा मोटर्स, आयओसी, एचडीएफसी, श्रीराम ट्रांसपोर्ट, कोल इंडिया आणि झी एंटरटेनमेंटचे शेअर वाढले तर बजाज ऑटो आणि मणप्पुरम फाइनांसचे शेअर कमी झाले.
@@AUTHORINFO_V1@@