'कोरोना'चा चीन अर्थव्यवस्थेवरही परिणाम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020
Total Views |
corona_1  H x W




गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांचे बुडाले ३० लाख करोड



बीजिंग : चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूची दहशत संपूर्ण जगभर पसरली आहे. आता हा विषाणू चीनची अर्थव्यवस्थाही पोकळ बनवत आहे. गेल्या महिन्याभरात गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी शेअर बाजारात बुडाले आहेत आणि गेल्या ३० वर्षांत प्रथमच चीनची अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे.


अमेरिकेबरोबर चाललेल्या व्यापार स्पर्धेमुळे चिनी कारखाने आधीपासूनच दबावात आहेत आणि आता कोरोनाव्हायरसने त्यांना आणखी एक धक्का दिला आहे. गेल्या ३० दिवसांत ४२,००० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक बुडल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा तान आला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच चिनी शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे.


याच काळात चीनचा शेअर बाजार नऊ टक्क्यांहून अधिक खाली आला आहे. त्याच बरोबर, २०२०च्या सुरुवातीपासूनच चीनचे चलन युआन आतापर्यंत १.२ टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. या परिस्थितीला पूर्ववत करण्यासाठी सरकारकडून शेअर बाजारात नव्याने १७४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे चीनच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@