शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसले ; भाजपची टीका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020
Total Views |

sharad pawar_1  
 
मुंबई : महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेच्या वेळेस शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गाजर दाखवले होते. पण, त्यानंतर बिनशर्त कर्जमाफीच्या नावाखाली सशर्त कर्जमाफीची घोषणा केली आणि शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. तरीही, सरसकट कर्जमाफीची आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा एकदा खंजीर खुपसण्याचे काम महाविकास आघाडीच्या सरकारने केले आहे. महाविकास आघाडीचे महत्वाचा भाग असलेले आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही' असे वक्तव्य केले होते. यावर भाजपने चांगलाच समाचार घेतला असून पुन्हा एकदा या सरकारवर आरोप केले आहेत.
 
 
 
 
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र या ट्विटर हॅण्डलवरून शरद पवारांच्या युटर्नवर टीका केली आहे. ''राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार नेहमीच्या सवयी प्रमाणे सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफी संदर्भात यु टर्न मारला आहे. सत्तेत येण्यापुर्वी 'बिनशर्त कर्जमाफी' मागणारे पवार साहेबांनी आता 'कर्जमाफी हा तोडगा नाही' असे म्हणत सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खूपसला आहे." असा चिमटा भाजपने काढला आहे.
 
महाराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ
 
 
 
 
 
याआधीही भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. वर्धामध्ये झालेल्या शिक्षिकेच्या हल्ल्यावरदेखील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. 'महाराष्ट्रात सध्या कायद्याचा बट्याबोळ करून ठेवला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामकाज सोडून राष्ट्रवादी व काँग्रेस समोर लोटांगण घालत सुट्टीवर गेले आहेत.' अशा आधयाचे ट्विट करून सरकारवर शरसंधान साधले होते.
@@AUTHORINFO_V1@@