शस्त्रक्रियेला पर्याय आयुर्वेद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020
Total Views |
aayurveda_1  H




हल्ली गुडघ्यापासून हृदयापर्यंत सगळ्या अवयवांची शस्त्रक्रिया केली जाते. जरासा एखादा अवयव दुखायला लागला की, अ‍ॅलोपॅथी गोळ्यांचा शरीरावर एकच भडिमार सुरू होतो. दुखणं थांबलं, तर गोळ्यांचा ‘साईड इफेक्ट’ तरी होतो आणि दुखणं थांबलं नाही तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. बरं दुखणं सुरू असताना, ‘सेकंड ओपिनियन’च्या फंदातही कोणी पडत नाही. त्यामुळे हल्ली अनेक छोट्या-मोठ्या आजारांसाठी शस्त्रक्रियेचा आधार घेतला जातो. लवकर बरे होणे आणि ऑफिस जॉईन करणे हा जणू ‘ट्रेंड’च झालाय. पण, या झटपट बरे होण्याच्या नादात आपण आपल्याच शरीराचे नुकसान करतोय, औषधांच्या भडिमारामुळे होणार्‍या अनेक ‘साईड इफेक्ट’च्या दरीत ढकलतोय, हे आपल्या लक्षातच येत नाही.


मुतखडा (kidney Stone), अर्श (piles), परितर्तिका (fissure), भगंदर (Fistula) या सगळ्यांसाठी हल्ली ऑपरेशन केले जातात. पण, शस्त्रक्रिया न करता तुम्हाला याचा खात्रीशीर उपाय मिळतो तो आयुर्वेदात! एवढेच काय, मानेपासून कंबरेपर्यंत मणक्यांचे सर्व आजार आपल्याला आयुर्वेदाने दूर करता येतात.


परवाचाच एक अनुभव सांगते. मुतखडा (Kidney stone) असलेला रुग्ण आला आणि म्हणाला, “डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे. कारण, खडा मोठा आहे.” रुग्णाच्या वेदनाही असह्य होत्या. पण, त्यांनी शस्त्रक्रियेच्या आधी आयुर्वेदाला एक ‘चान्स’ दिला आणि तीन दिवसांमध्ये त्यांची व्याधी बरी झाली. अशा रुग्णांसाठी आयुर्वेदातील प्रभावी उपाय म्हणजे ‘पिंड स्नेह.’ म्हणजे जेवणाआधी देशी गायीचे तूप पिणे. जेवणाआधी तूप प्यायल्याने खडा हळूहळू खाली सरकत जातो. त्यासोबतच ‘चंद्रप्रभा’, ‘पाषाण’ सारखी काही प्रभावी औषधं आणि ‘भेद बस्ती’ दिली. तिसर्‍या दिवशी तो रुग्ण खडा दाखवण्यास घेऊन आला.


याने झाले काय? एक तर शस्त्रक्रिया टळली. दुसरे, अ‍ॅलोपॅथीच्या औषधांमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) टळले. तिसरे, सगळ्या आयुर्वेदिक उपचारांना वेळ खूप लागतो हा गैरसमज दूर झाला.
मेडिकल पॉलिसीमुळेही हल्ली शस्त्रक्रिया सर्रास केली जातात. पण, आपल्या हे लक्षात येत नाही, की मेडिकल पॉलिसी आपल्याला शस्त्रक्रिया, गोळ्या आणि झालेल्या सर्व खर्चाची १०० टक्के भरपाई देत नाही. २५ ते ३० टक्के खर्च आपल्यालाच उचलावा लागतो. मग तुम्हाला त्याच २५-३० टक्के खर्चात खात्रीशीर उपाय मिळाला तेसुद्धा शरीराला कुठलाही अपाय न होता, तर चालणार आहे ना? ज्या आजारांवर ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही, त्यावर आमचे काही म्हणणे नाही. पण एवढे नक्की सांगावेसे वाटते की, ऑपरेशनच्या आधी आयुर्वेदाला एखादा ‘चान्स’ तरी नक्की द्या!

(अधिक माहितीसाठी संपर्क : पंचवटी आयुर्वेदिक केंद्र, ठाणे ७६६६०४६५४४ / ९८६९०७६३९७)
@@AUTHORINFO_V1@@