शरजीलच्या समर्थनासाठी मुंबईत घोषणाबाजी ; कारवाई कधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020
Total Views |

sharjil_1  H x
 
मुंबई : मुंबईतल्या आझाद मैदानावर देशद्रोहाचा आरोप असलेले शरजील इमाम याच्या समर्थनासाठी घोषणाबाजी झाल्याचा व्हिडीओ समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घोषणाबाजी विरोधात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याची मागणी करत राज्य सरकारला प्रधान विचारले आहेत. 'मुंबईमध्ये हे काय चाललंय? आणि महाराष्ट्र सरकार हे कसे काय खपवून घेत आहे.' असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.
 
 
 
 
"मतांच्या राजकारणासाठी काहीही खपवून घेतले जाणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझी अपेक्षा नाही, पण मी अपेक्षा करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर कारवाई करतील. तसे न झाल्यास देश तुम्हाला माफ करणार नाही !" अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे.
 
 
 
 
 
त्याचसोबत फडणवीस यांनी हा वायरल व्हिडियोदेखील ट्विट करत यावर कारवाई व्हावी असे मत वक्त केले आहे. भारतापासून आसाम स्वतंत्र करा असे म्हणत देशविरोधी वक्तव्य शरजील इमाम याने केले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@