कोरोनाचा भारतात तिसरा 'पॉझिटिव्ह' रुग्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020
Total Views |

kerala corona_1 &nbs
 
केरळ : जगभरामध्ये दहशत पसरवलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेला तिसरा रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. याआधीदेखील केरळमध्ये २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. तर, आता तिसरा रुग्णदेखील केरळमध्येच सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. चीनमधून आल्यानंतर तपासणी केल्यानंतर या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णाला डॉक्टरांच्या निगराणीखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.
 
 
संबंधित महिला रुग्ण या चीनमधील वुहान विद्यापीठाच्या विध्यार्थी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर केरळमधील थ्रिसूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान प्रांतातून झाली होती. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३०४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासामध्ये तब्बल ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त फटका हुबेई प्रांताला बसला असून येथे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारपेक्षा अधिक लोकांना विषाणूची लागण झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@