जामिया, शाहीन बागच्या घटनांनंतर डीसीपीची हकालपट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020
Total Views |

DCP Delhi Chinmay_1 
 
 
नवी दिल्ली : दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामधील गोळीबार आणि शाहीनबागमधील गोळीबार याप्रकरणी दक्षिण पूर्व दिल्लीचे पोलिस उपायुक्त यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तेथील वातावरण पाहता निवडणूक आयोगाने पोलीस उपयुक्त चिन्मय बिस्वाल यांच्या ही कारवाई केली. ते गृहमंत्रालयाला याबाबत अहवाल देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहीन बागच्या सद्यस्थिती लक्षात घेता निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. चिन्मय बिस्वाल यांच्या जागी निवडणूक आयोगाने अतिरिक्त डीसीपी कुमार ज्ञानेश यांना पदभार सोपवला आहे.
 
 
सुरक्षा पथक, गोळीबाराच्या घटना आणि रस्ता बंदीवरून आयोगाच्या पथकाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरच आयोगाने ही कारवाई केली आहे. शाहीन बागेत नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून १ फेब्रुवारी रोजी त्या भागात एका युवकाने गोळीबार केला. मात्र, त्या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. त्याआधीही जामिया मिलिया विद्यापीठाबाहेरील भागात पोलिसांच्या उपस्थितीत तरुणाने गोळीबार केल्याच्या घटनेनंतर पोलिसांवर प्रश्न निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत शाहीन बागेत आणखी एक घटना घडली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@