जामिया विद्यापीठामध्ये अज्ञातांकडून गोळीबार

    03-Feb-2020
Total Views |

jamia islamia uni_1 
 
नवी दिल्ली : दिल्लीमधील जामिया परिसरातील गोळीबार आणि शाहीन बागमधील आंदोलन सुरु असतानाच गोळीबार यानंतर पुन्हा एकदा जामिया विद्यापीठामध्ये गोळीबाराची घटना घडली. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेट नंबर ५ जवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला होता. तर, शाहिनबागमध्ये आंदोलनादरम्यान दुसरा गोळीबार झाला होता.
 
 
 
 
स्कुटरवरून दोन संशयित व्यक्ती विद्यापीठ परिसरातील गेट नंबर पाच जवळ आले. त्यातील एका व्यक्तीने लाल रंगाचे जॅकेट परिधान केले होते. शाहीन बागपासून दोन किमी दूर असलेल्या गेटजवळच हा गोळीबार झाला असल्याची माहिती प्रत्यदर्शींनी पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये खळबळ उडाली. ३० जानेवारीला जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली होती. सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या राजघाटपासून विद्यापीठापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू असताना यावेळी एका तरुणाने गोळीबार केला होता. यात एक विद्यार्थी जखमी देखील झाला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121