निसर्गसंपन्न लक्षद्वीप बेटांवर जगातील पहिले 'समुद्र काकडी' संवर्धन क्षेत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Feb-2020
Total Views |

coral_1  H x W:

 
 

प्रशासनाकडून जगातील सर्वात मोठ्या सागरी संरक्षित क्षेत्राची घोषणा

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - लक्षद्वीप बेट समूह प्रशासनाने दोन नवीन सागरी संरक्षित क्षेत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये जगातील पहिले समुद्र काकडी (सी कुकुंबर) राखीव संवर्धन क्षेत्र आणि जगातील सर्वात मोठे सागरी राखीव संवर्धन क्षेत्राचा समावेश आहे. संरक्षित करण्यात आलेल्या या जागा ६८५ चौ.किमी क्षेत्रावर पसरल्या आहेत. या जागांचा संवर्धनासाठी स्थानिक रहिवासी, वन विभाग आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) मोलाची कामगिरी बजावली आहे.
 

coral _1  H x W 
 
 
 
निसर्गसंपन्न अशा लक्षद्वीप बेटांवर वन्यजीव संरक्षित क्षेत्रांची भर पडली आहे. बेट प्रशासनानेे गुरुवारी तीन संरक्षित क्षेत्राच्या घोषणेची अधिसूचना प्रकाशित केली. काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपमधून समुद्र काकडीची तस्करी उघड झाली होती. भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत समुद्र काकडी प्रथम श्रेणीत संरक्षित आहे. म्हणजेच या प्रजातील वाघाऐवढे संरक्षण आहे. मात्र, चीनसारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये पारंपारिक औषध निर्मितीमध्ये या काकडीचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रजातीला तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा मागणी आहे. अशा संरक्षित आणि तस्करीच्या जाळ्यात सापडलेल्या प्रजातीची लक्षद्वीप मधून मोठ्या प्रमाणावर तस्करी उघड झाल्यानंतर प्रशासन हादरले होते. यांसर्दभात कारवाई करत प्रशासनाने आता लक्षद्वीपमध्ये समुद्र काकडी राखीव संवर्धन क्षेत्राची निर्मिती केली आहे.
 
 

coral _1  H x W 
 
समुद्र काकडींच्या संवर्धनासाठी संरक्षित करण्यात ही जागा २३९ चौ.किमीची असून ती चेरियापाणी येथील प्रवाळ बेटांमध्ये आहे. या राखीव संरक्षित क्षेत्राला लक्षद्वीपचे पहिले अध्यक्ष आणि ज्येष्ठे नेते डाॅ.के.के.मोहम्मद कोया यांचे नाव देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे समुद्र काकडीच्या संवर्धनासाठी संरक्षित करण्यात आलेले हे जगातील पहिलेच क्षेत्र असून यापुढे ही जागा 'डॉ. के.के मोहम्मद कोया समुद्र काकडी राखीव संवर्धन क्षेत्र' म्हणून ओळखली जाईल. याशिवाय अमिनी आणि पिट्टी या बेटसमूहादरम्यान जगातील सर्वात मोठे संरक्षित सागरी क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. हे क्षेत्र ३४४ चौ.किमी जागेवर पसरलेले आहे. या संरक्षित क्षेत्राचे नामकरण ज्येष्ठ समाजसेवक ए. अट्टकोया थांगल यांचे नावे 'अट्टकोया थांगल सागरी राखीव संवर्धन क्षेत्र' असे करण्यात आले आहे.
 
 
 
लक्षद्वीप बेटांवर 'बीएनएचएस'कडून सागरी जैवविविधतेचे निरीक्षण आणि संवर्धनाचे काम गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. २००४ साली संस्थेने सर्वप्रथम या बेटांवर सागरी संवर्धन क्षेत्रासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. त्यानंतर आता १२ वर्षांनी याठिकाणी सागरी संवर्धन क्षेत्राची घोषणा करण्यात आल्याची माहिती 'बीएनएचएस'चे संचालक डाॅ.दिपक आपटे यांनी दिली. यामध्ये स्थानिक रहिवाशी आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक दामोदरन यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@