आजमारा क्रुझवर ‘तायडें’च्या कलाकृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2020
Total Views |


ganesh tayade artist_1&nb


अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील ‘आर्टवेव्ह’ या गॅलरीव्यवस्थापनाने गणेश तायडे यांच्या कलाकृतींना अधिक पसंती दिली. त्यांनी ‘आजमारा क्रुझ’ (Azamara Cruise) बरोबर सहयोग करून या महाकाय जहाजावरील गॅलरीमध्ये चित्रकार गणेश तायडे यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत.



कलाकारांच्या कलाकृतींना रसिक मान्यता मिळाली की
, त्याला आत्मिक समाधान प्राप्त होते. मुंबईनगरी जशी देशाची ‘आर्थिक’ राजधानी आहे, तद्वतच मुंबईनगरीला ‘गॅलरी सिटी‘ किंवा ‘गॅलरी शहर’ अशीही ओळख प्राप्त झालेली आहे. मुंबईच्या ‘जहांगिर’ कलादालनात चार-पाच महिन्यांपूर्वी, प्राध्यापक आणि ज्येष्ठ चित्रकार गणेश तायडे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन संपन्न झाले होते. अशी प्रदर्शने कलारसिकांसह इतरही व्यक्ती पाहतात. त्याप्रमाणे गणेश तायडे यांच्याही कलाकृतींना कलारसिकांसह इतरही व्यक्तींनी प्रतिसाद दिला होता. आपल्यासाठी विशेषतः कलाक्षेत्रातील विविध संधी शोधणार्‍या कलाकारांसाठी प्रोत्साहनाची बाब म्हणजे, अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील ‘आर्टवेव्ह’ या गॅलरीव्यवस्थापनाने गणेश तायडे यांच्या कलाकृतींना अधिक पसंती दिली. त्यांनी ‘आजमारा क्रुझ’ (Azamara Cruise) बरोबर सहयोग करून या महाकाय जहाजावरील गॅलरीमध्ये चित्रकार गणेश तायडे यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत.



ganesh tayade artist_1&nb




माझ्या माहितीनुसार
, महाराष्ट्रीयन चित्रकारांच्या यादीमध्ये कदाचित प्रथमच गणेश तायडेंसारख्या महाराष्ट्रीयन चित्रकाराच्या कलाकृती ‘आलिशन क्रुझ’च्या कलादालनात पाण्याच्या लहरींबरोबरच कलारसिकांच्या मनाच्या लहरींना रम्य दुनियेचा आनंद देत आहेत. स्थिर गॅलरींमध्ये कलाकृती प्रदर्शित होतात, हे सर्वज्ञात आहेच. परंतु, एखाद्या मोठ्या आलिशान जहाजावर कलाकृती प्रदर्शित होतात, हे फारच कमी लोकांना ज्ञात असेल. हे ‘आजमारा क्रुझ’ म्हणजे एक मोठे अपार्टमेंटच आहे वा एखादी ‘वाडीसदृश गाव’ आहे. त्यात विराजमान झाल्यावर जर खिडक्यांमधून बाहेर पाहिले आणि अथांग समुद्र दिसलाच, तरच आपण ‘जहाजात’ बसलो आहोत असे वाटू लागते. अशा प्रकारचे जहाजावरील कलाकृतींचे प्रदर्शन म्हणजे एक अद्भुत अनुभव असल्याचे प्रा. तायडे सांगत होते. या क्रुझवरील प्रदर्शनात त्यांच्या वास्तववादी शैलीतील आणि अर्धवास्तववादी शैलीतील कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. आलिशान वातावरणात ‘मनभावन’ कलाकृतींचे प्रदर्शन म्हणजे ‘स्वर्गीय आनंद’च प्रत्येक प्रवासी घेत असतात. याबद्दल संदेह नाही, असे गॅलरी ‘आर्टवेव्ह’चे सीईओ पॉल एन. वाय. यांनी सांगितले.

 



ganesh tayade artist_1&nb



हे प्रदर्शन जानेवारी ते मार्च २०२०या तीन महिन्यांसाठी
‘आजमारा क्रुझ’वर सुरू आहे. समुद्रप्रवासांने देशोदेशी फिरत-फिरत चित्रकार तायडे यांच्या या कलाकृती सागरी सफर करीत आहेत. अशा प्रकारे इतरही जहाजांवर अशा प्रकारच्या गॅलरी असाव्यात. कदाचित असतीलही. परंतु, चित्रकार गणेश तायडे यांच्या प्रमाणेच इतरही कलाकारांच्या कलाकृती अशा प्रकारच्या जहाजांवर प्रदर्शित व्हावयास हव्यात. चित्रकार गणेश यांनी जणू ‘श्रीगणेशा’ केला आहे, अशा प्रकारच्या प्रदर्शनाद्वारे! त्यांच्या कलाकृतींद्वारे पाहणार्‍यांना आनंद तर लाभावाच; परंतु अशाप्रकारच्या कलाकृती संग्रही असाव्यात, याचा मोह व्हावा, अशी अपेक्षा! त्यांना शुभेच्छा!

 



- प्रा. गजानन शेपाळ 
@@AUTHORINFO_V1@@