पृथ्वी गोल नाही, सपाट आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2020   
Total Views |


मॅड माईक_1  H x



धार्मिक प्रावधानातून लोकांच्या मनावर हे चांगलेच ठसवले गेले होते. त्यामुळे माणूस चंद्रावर गेला, मंगळावर पोहोचला पार सूर्याच्या बाजूला उभे राहूनही त्याने पृथ्वीचे प्रत्यक्ष फोटो काढले आणि सिद्ध केले की पृथ्वी गोल आहे, तरीसुद्धा बायबलमध्ये तसे कुठे लिहिले आहे? पृथ्वी गोल नाहीच.



एकच तारा समोर आणिक

पायतळी अंगार होता...

ध्येय माणसाच्या आयुष्याला विलक्षण अर्थ आणि कलाटणी देते आणि हे ध्येय अर्थातच सर्जनशीलतेमुळे माणसाच्या ठायी निर्माण होते. एका नवीन अज्ञाताचा शोध घेणारी संकल्पना किंवा आधीच असलेल्या ज्ञाताचा अर्थ लावणारी सर्जनशीलता. या सर्जनशीलतेमुळे एक नवा ध्यास, चिंतन सतत मनात बाळगून त्यासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या लोकांची या जगात कमी नाही. नवा शोध घेताना कोलंबसने म्हणे जगात अस्तित्व असलेले, तरीही अज्ञात असलेले प्रदेश शोधले, तर इथे भारतात स्वत्व, स्वधर्म स्वराज्याचा शोध घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न स्थानिकांमध्ये पेरले. हाही एक शोधच होता. कारण, आपण अन्यायाविरोधात लढू शकतो, जिंकू शकतो याच्या स्मृती स्थानिकांच्या विस्मृतीत गेल्या होत्या. जनतेला स्वतःच्या आत्मशक्तीचा शोध लावून देणार्‍या छत्रपतींना स्वराज्याचे वैज्ञानिकच म्हणायला हवे.



शोध कोणते आणि कुठे
, कसे लागतील, कुणी त्याची व्याप्ती कशी मांडेल, हे सांगणे कठीण आहे. या अशा शोधक प्रवृत्तीला प्राप्त परिस्थितीच्या विरोधात, समर्थनार्थ प्रयोग करावेच लागतात. हे प्रयोग त्या-त्या वेळच्या समाजाला, साम्राज्याला रूचतीलच असे नाही. जगाच्या पटलावर अशी अनेक उदाहरणे आहेत की, एखाद्याने नवीन संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला या ना त्या कारणाने विरोध झाला. पाश्चिमात्त्य संस्कृतीमध्ये तर बायबलच्या बाहेरचे, ‘नव्या करारा’च्या बाहेरचे सगळेच खोटे असेच मानण्यात येई. त्यामुळे ‘बायबल वाक्यम् प्रमाणम्’ सांगत त्याकाळच्या कितीतरी वैज्ञानिकांना, दार्शनिकांना छळ सोसावा लागला. याबाबतीत ‘अमन सुकून’चा उच्चार करणारे कुराणचे श्रद्धाळूही मागे नाहीत. जे कुराणात नाही, ते वास्तवात असले तरी ते नाहीच, यावर आजही श्रद्धाळू ठाम आहेत.



या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची आसिया बिबी आठवल्याशिवाय राहत नाही
. कथित इशनिंदा केली म्हणून तिला पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, जागतिक रेट्यामुळे तिची फाशी थांबली. ख्रिस्ती आसियाने मुस्लीम असलेल्या मैत्रिणीच्या पेल्यातले पाणी प्यायले, हाच काय तो तिचा दोष. वर मुस्लीम आणि ख्रिस्ती भेद नसून अल्ला आणि येशू एकच आहे, असे तीने म्हटले होते. आसियाचा गुन्हा हा की, कुराणात येशूचा उल्लेख नाही. मग येशू आणि अल्लाची बरोबरी करणारी ही कोण? याचाच अर्थ जगातले बहुसंख्याक असलेले धर्म जुन्या चौकटींना हात लावायला तयार नाहीत.



हे सगळे आठवायचे कारण
, लॉस एंजेलिसमधला मायकल, ज्याला लोक ‘मॅड माईक’ म्हणून ओळखायचे, त्याचा २२ फेब्रुवारीला मृत्यू झाला. कारण काय तर त्याने स्वतः घरात एक रॉकेट बनवले होते. त्या रॉकेटने १५०० मीटर उंच उड्डाण करायचे, असे त्याने ठरवले. तसा त्याने प्रयोगही केला. मात्र, ते रॉकेट क्रॅश झाले आणि त्यातच मायकलचा मृत्यू झाला. त्याला हे असे उड्डाण करायचे होते, कारण म्हणे त्याला सिद्ध करायचे होते की, पृथ्वी गोल नसून सपाट आहे. हे सिद्ध करताना त्याने स्वत:च्या मृत्यूलाच आमंत्रण दिले. तिथल्या काहींचे म्हणणे आहे की, मायकलचा ‘पब्लिसिटी स्टंट’ होता आणि त्यातून त्याला पैसे मिळवायचे होते. असेलही. वरवर पाहता मायकल हा विक्षिप्त वाटतो, पण पाश्चिमात्त्य संकल्पनेचा मागोवा घेतला तर तिथे कालपर्यंत हा समज होता की, पृथ्वी गोल नाहीच!



धार्मिक प्रावधानातून लोकांच्या मनावर हे चांगलेच ठसवले गेले होते
. त्यामुळे माणूस चंद्रावर गेला, मंगळावर पोहोचला पार सूर्याच्या बाजूला उभे राहूनही त्याने पृथ्वीचे प्रत्यक्ष फोटो काढले आणि सिद्ध केले की पृथ्वी गोल आहे, तरीसुद्धा बायबलमध्ये तसे कुठे लिहिले आहे? पृथ्वी गोल नाहीच. नास्तिक आणि इतर धर्मीय बायबलचा अपमान करण्यासाठी पृथ्वीला गोल ठरवत आहेत, असे मत काहींचे आजही आहे. असे मानणार्‍यांपैकी एक मायकल असू शकतो, कारण, ज्या अमेरिकेत सुरक्षा आणि इतरही नियम कडक आहेत, तिथे खुलेआम घरातून रॉकेट उडविण्याचा प्रयोग करायची परवानगी मायकलला मिळालीच कशी? की, मायकल जे करतोय ते बायबलच्या नियमाच्या शोधाला पुष्टी मिळवण्यासाठी करतोय, असे तर संबंधितांना वाटले नाही. यात अशीही शंका घ्यायला वाव आहे की, तिथल्या संबंधितांचीही थोडी श्रद्धा असावी की, बायबलमध्ये लिहिल्यानुसार पृथ्वी गोल नाही.

@@AUTHORINFO_V1@@