‘विशाल’ कार्याचा वसा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2020
Total Views |


vishal kadane_1 &nbs



होतकरू तरुणांना शिक्षणासाठी, तर दुर्धर आजारांनी ग्रस्त गरिबांना मदतीचा हात देणारे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विशाल कडणे यांची ही जीवनगाथा...



उतू नये
, मातू नये

घेतला वसा सांडू नये।

या वचनात अनेकार्थ दडले आहेत. समाजात स्वतः कार्यकर्तृत्वाने मोठं होताना दुसर्याला हात देऊन आपल्याबरोबर घेणारे हात एकदी बोटावर मोजण्याइतकेच. मात्र, स्वकष्टाने मोठे होत असताना दुसर्याला सहकार्य करणारे काही सद्भावी लोकही या समाजात सक्रीय असल्याने माणुसकी, प्रेम टिकून आहे. असेच एक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे विशाल कडणे.



विशाल यांचे आयुष्य मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडूपमध्ये चार बाय चारच्या छोट्याशा खोलीत गेले
. वडील ड्रायव्हर, तर आई गृहिणी व एक लहान बहीण असा चौकोनी परिवार. पण, याही परिस्थितीत विशाल यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून ठाण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला, त्यानंतर ऐरोलीमधील दत्ता मेघे महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले. एवढ्यावर विशाल थांबले नाहीत, तर संपूर्ण भारतातून १५वा क्रमांक पटकावून त्यांनी एम.टेक केले. त्यामुळे जात्याच हुशार असल्याने विशाल यांना कष्ट करण्याची सवय होतीच. त्यामुळे एका चांगल्या कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती.



विशाल यांचे वडील ड्रायव्हर असूनही त्यांनी आपल्या मुलांना संस्कार आणि शिक्षणाची श्रीमंत शिदोरीच बहाल केली
.त्यांच्या आईनेही कपड्याची काही छोटीमोठी कामे घरी करुन कुटुंबाला आर्थिक हातभर लावला. त्यामुळे शिक्षणाबरोबरच कष्ट उपसण्याचे संस्कारही त्यांच्या मनावर आपसुकच कोरले गेले. अगदी सर्वसामान्य घरातून शिक्षण घेतल्याने त्यांना आर्थिक परिस्थितीची नेमकी जाणीव होती. आपल्याला दोन वेळचे जेवण तरी नीट मिळतंय आणि इतकं शिकता येतंय, ही भावनाच त्यांच्यासाठी मुळात खूप प्रेरणादायक होतीइंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानाही अनेकांना विशाल यांनी समाजकार्य करताना पाहिले. मग आपणही समाजासाठी काम करायला हवे, तेे आपलेही परमकर्तव्य आहे, ही भावना विशाल यांच्या मनात वृद्धींगत झाली व त्यातूनच त्यांनी होतकरू तरुणांसाठी शिक्षणकार्याची सुरुवात केली.



महाराष्ट्राच्या कानाकोपर्
‍यातून अनेक मुले मुंबई व जवळपासच्या महानगरात शिक्षणासाठी दाखल होतात. आपल्या घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्दीने शिक्षण पूर्ण करतात. या मुलांना त्यांची शैक्षणिक फी भरायला मदत करणे, त्यांना शिक्षणपयोगी साहित्य पुरवणे इत्यादी स्वरुपात विशाल आज या मुलांना मदत करतात. आपली मदत कुणा गरजूला होते, यातच त्यांना धन्यता वाटते. पाणीटंचाई ही शहरांसह गावखेड्यांना भेडसावणारी एक भीषण समस्या. याची पूर्ण कल्पना असल्यामुळे २००३मध्ये विशाल यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांवर काम करण्यास सुरुवात केली आणि हा प्रकल्प तत्कालीन महापौर दत्ता दळवी यांना खूप आवडला. या प्रकल्पाचा डेमो महापौरांनी त्यांना दाखविण्यास सांगितला आणि त्यानंतर त्यांचे खूप कौतुकही झाले.



विशाल इंजिनिअरिंग करत असताना उत्तराखंडमध्ये पूर आला होता
. त्यावेळी विशाल पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. हे काम करताना बर्‍याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था त्यांच्या संपर्कात आल्या. यातून अनेक मदतीचे हात पुढे आले. ‘अक्षयपात्र’चे भगवानजी चौहान यांना विशाल यांनी मुंबईतले प्रश्न दाखवून दिले. मुंबईतील होतकरू मुलांची यादी तयार करुन त्यांच्या हातांना काम उपलब्ध करून दिले. तसेच टाटा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची फार आबाळ होते. त्यांना कपडे आणि जेवण देण्याचे काम विशाल करतात. कर्करोग, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार कमीत कमी किंवा मोफत व्हावेत, यासाठी संत निरंकारी महाराजांच्या संस्थेमार्फत त्यांचे कार्य सुरू आहे. या मोठमोठ्या उपचारांसाठी लोकांना आपले घरदारसुद्धा विकावे लागते. अशा लोकांना विशाल यांनी मदत केली आहे. गरजूंना अवयवदानाच्या माध्यमातून प्रत्यारोपण व संपूर्ण उपचार होईपर्यंत, विशाल सर्वोतोपरीने मदत करतात. यामुळे अनेकांना विशाल यांनी आजवर जीवनदान दिले आहे.



विशाल यांचे नवनवीन उपक्रम सुरूच आहेत
. सामाजिक कार्यासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानितकही करण्यात आले आङे. २०१३ मध्ये मुंबई महानगरपालिका स्वीकृत सदस्यपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच दैवज्ञ चषक समन्वयक समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडे त्यांची शिफारससुद्धा करण्यात आली होती. याशिवाय आशिया खंडातील सर्वात मोठी हाऊसिंग फेडरेशन असलेल्या मुंबै बँकेच्या हाऊसिंग या प्रतिष्ठित मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्या मुंबई जिल्ह्यासह हाऊसिंग फेडरेशनच्या तज्ज्ञ संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २०१९ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारत परिरक्षण विभागाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सल्लागारपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. आजचे यश हे विशाल यांच्या सत्कार्याची पावती आहे. आज त्यांच्याकडे सर्व सुखंसुविधा आहेत, मात्र आपले बालपण आणि पालकांनी घेतलेले कष्ट ते आजही विसरलेले नाहीत. आज त्यांच्या कुटुंबात त्यांचे आईवडील आणि पत्नी आहे. या सर्वांचा विशाल यांना खूप आधार आहे. विशाल यांचे जीवनदानाचे काम असेच सुरू राहो, या दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

- कविता भोसले

@@AUTHORINFO_V1@@