झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित 'झॉलीवूड'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020
Total Views |
zollywood_1  H



तृषांत इंगळे दिग्दर्शित 'झॉलीवूड' चित्रपटाचे पोस्टर लाँच

मुंबई : विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित ‘झॉलीवूड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्वतः झाडीपट्टी रंगभूमीवर काम केलेला तृषांत इंगळेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, 'न्यूटन', 'सुलेमानी किडा' असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत.


विशबेरी फिल्म्स यांनी "झॉलीवूड" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ कोण याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, अत्यंत लक्षवेधी अशा या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.


चित्रपटाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेने स्वतः झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केले आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या इराद्याने तृषांतने १६व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता ‘झॉलीवूड’ या चित्रपटाच्या रुपाने त्याने पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सुलेमानी किडा, न्यूटन या चित्रपटातून अमित मसूरकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. येत्या १७ एप्रिल हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@