विधानसभा अध्यक्ष्यांनी फेटाळला सावरकरांचा गौरव प्रस्ताव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020
Total Views |

Savarkar_1  H x





मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकर गौरव प्रस्ताव फेटाळला आहे. यावरून विधासभेत एकच गदारोळ सुरू झाला. भाजप आमदारांनी सभागृहामध्ये मोठ्याने घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. सावरकर गौरव प्रस्ताव हा नियमांत बसत नाही असे सांगत नाना पटोलेंनी प्रस्ताव फेटाळला. अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळताच सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली. विधानसभेत एकीकडे मोठ्याने घोषणाबाजी सुरू होती तर दुसरीकडे सभागृहाचे कामकाज सुरू होते. सावरकर महाराष्ट्राची आन-बान-शान अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत 'शिदोरी' मासिकावर बंदी घालावी अशी मागणीदेखील केली. या दोन्ही मुद्द्यांवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेत आमदारांनी व्हेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली.
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रीया देताना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सरकार असो किंवा विरोधक असो कोणीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने राजकारण करू नये, ज्यांना सावरकरांचे नाव घ्यायचे असेल त्यांनी त्यांचा आदरच करायला हवा. आम्ही सावरकर कुटूंबीय म्हणून सरकारकडून कुठलीही अपेक्षा नाही. सावरकर कुटूंबियांनी देशासाठी कायम त्यागच केला आहे. मात्र, वारंवार काँग्रेस आणि शिवसेनाप्रणित सरकार हे अशाप्रकारे सावरकरांचा अपमान करणार असेल हे निषेधार्ह आहे, असा घणाघात रणजीत सावरकर यांनी दिली आहे.
 
 
सत्तेसाठी खालचा स्तर गाठणाऱ्यांचा निषेध
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानजनक वक्तव्य होत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारावर चालणारी शिवसेना गप्प का? सावरकरांबद्दल राजकारण करून त्यांचा अवमान करण्याचे काम काँग्रेसकडून झाले आहे, असा आरोप सावरकर यांनी केला आहे.




 
 
@@AUTHORINFO_V1@@