बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या ५ मार्चला 'जीसॅट-१' या इमेजिंग उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. 'जीएसएलव्ही-एफ१०' प्रक्षेपण वाहनाद्वारे हा उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. ५ मार्चला संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून हे प्रक्षेपण नियोजित आहे.
तब्बल २ हजार २७५ किलोच्या या उपग्रहाद्वारे पृथ्वीचे जवळून निरीक्षण करता येणार आहे. 'जीएसएलव्ही-एफ१०' प्रक्षेपण वाहनाच्या भौगोलिक कक्षेत हा उपग्रह असणार आहे. या कक्षेतून कार्यरत हा उपग्रह भारतीय उपखंडातील ढगांच्या परिस्थितबाबत अचूक निरीक्षण नोंदवणार आहे. प्रोप्लशन सिस्टिमचा वापर करून हा उपग्रह अंतिम भौगोलिक कक्षेपर्यंत जाईल, अशी माहिती इस्रोने दिली आहे.