या ‘नऊ’ जणी नेमेके करणार तरी काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020
Total Views |
devi_1  H x W:



‘देवी’मध्ये काजोलसह दिसणार दिग्गज मराठी अभिनेत्री!
मुंबई : दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नव्या विषयांवर आधारित या शॉर्टफिल्मना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसादही मिळतो. अशाच एका नव्या शॉर्टफिल्मचा ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. यातून एक नवा विषय, एक नवी कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींचा मेळ या शॉर्टफिल्ममध्ये पाहायला मिळणार असल्याने सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.


लवकरच काजोलची 'देवी' ही शॉर्टफिल्म रसिकांच्या भेटीला येत आहे. फक्त काजोलच नाही तर या शॉर्टफिल्ममध्ये तिच्यासोबत या फिल्ममध्ये श्रृती हसन, नेहा धुपिया, नीना कुळकर्णी, मुक्ता बर्वे, संध्या म्हात्रे, रमा जोशी, शिवानी रघुवंशी आणि यशस्विनी दयामा या एकून नऊ अभिनेत्री प्रमुख भूमिका साकरत आहेत. नऊ अत्याचारग्रस्त महिलांच्या कथेवर आधारित ही शॉर्टफिल्म असणार आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये या नऊ जनी एकमेकींशी कुठल्यातरी गंभीर विषयावर चर्चा करताना दिसत आहेत. तेव्हा हा नेमका कसला विषय सुरु आहे आणि या नऊ जणी नेमके काय करणार, असा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडला आहे.





काजोल या शॉर्ट फिल्मद्वारे शॉर्ट फिल्म क्षेत्रात पदार्पण करते आहे. अवघ्या दोन दिवसांत 'देवी' या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. नवोदित लेखिका आणि दिग्दर्शिका प्रियांका बॅनर्जीने दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन यांनी या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@